इंडियन प्रिमियर लीग २०२२ (IPL ) च्या हंगामात दोन नविन संघ खेळणार आहेत. भारतीय नियामक मंडळाला (BCCI) याचा जबरदस्त फायदा होणार आहे. जवळपास ५००० कोटींचा फायदा होणार आहे. आयपीएलमध्ये आता ८ संघ खेळत आहेत. पुढच्या वर्षीच्या हंगामात (२०२२) १० संघ खेळणार आहेत. आयपीएलच्या संचालक परिषदेच्या बैठकीत नुकतीचं या प्रकियेवर चर्चा करण्यात आली असून याला अंतिम स्वरुप देण्यात आले.
बीसीसीआयच्या सुत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार '' कोणतीही कंपनी ७५ कोटी रुपये देऊन बोली दस्तऐवज खरेदी करु शकते. याच्या अगोदर दोन संघांसाठी आधार मुल्य १७०० कोटी रुपये ठेवले होते. आता ते वाढवून २००० कोटी रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपीएलची आर्थिक बाजू पाहणाऱ्या एका सूत्राने सांगितले की, जर बोली प्रक्रिया ठरल्याप्रमाणे पार पडली तर बीसीसीआयला किमान 5000 कोटी रुपयांचा नफा होईल, कारण अनेक कंपन्या बोली प्रक्रियेत रस दाखवत आहेत. बीसीसीआयला किमान 5000 कोटींची अपेक्षा आहे. आयपीएलच्या पुढील हंगामात 74 सामने होणार आहेत. त्यामुळे हे सर्वांसाठी फायदेशीर असणार आहे.
असे कळले आहे की ३००० कोटी किंवा त्याहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांना बोली प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी असेल. एवढेच नाही तर बीसीसीआय कंपन्यांच्या एका गटालाही संघ खरेदी करण्याची परवानगी देण्याचा विचार करत आहे. यामुळे बोली प्रक्रिया अधिक रोचक होणार आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.