भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात ५ सामन्याची मालिका सुरु आहे. त्यातले तीन सामने पार पडले आहेत. आता चौथा सामना (Fourth Test Match) ओव्हालमध्ये खेळला जाणार आहे. मालिका सध्या बरोबरीत आहे. पहिला सामना पावसामुळे ड्रा झाला होता. तिसऱ्या सामन्यात भारताचा इंग्लंडने दारुण पराभव केला होता. एक डाव आणि ७६ धावांनी भारत हारला होता. यामुळेच चौथ्या सामन्याच भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती.
भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) प्लेईंग ११ मध्ये मोठे बदल करणयाची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज इशांक शर्माच्या (Ishant Sharma) जागेवर रविचंद्रन आश्विन आणि जडेच्या जागेवर शार्दुल ठाकूरला जागा मिळू शकते. सुत्रांच्या माहितीनुसार खराब फार्ममध्ये असलेला अजिंक्य रहाणेही संघातून बाहेर जाऊ शकतो. त्याच्या जागेवर सुर्यकुमार यादवला जागा मिळण्याची शक्यता आहे.
रविंद्र जडेजा मागच्या तिनही सामन्यात काही खास कामगिरी करु शकला नाही. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये दोन्हीमध्ये तो फ्लॅाप गेला आहे. तिसऱ्या सामन्यात कोहलीने पहिल्या डावत ४ आणि दुसऱ्या डावात ३० धावा बनवल्या आहेत. गोलंदाजीमध्ये २ बळी घेतले आहेत. अजिंक्य रहाणेही मागच्या तिनही सामन्यात सपशेल फ्लॅाप ठरला आहे. असे म्हटले जात आहे की चौथ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाच्या जागेवर शार्दुल ठाकूर खेळू शकतो. कारण शार्दुल चांगली फलंदाजाही करु शकतो.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.