Saharanpur Kabbadi Tournament , Uttar Pradesh , Kabbadi Players , Video Viral saam tv
Sports

राज्य स्पर्धेत शौचालयात जेवण तयार करुन दिलं खेळाडूंना; क्रीडाधिकारी निलंबित (पाहा व्हिडिओ)

देशभरातील क्रीडाप्रेमी या प्रकराचा तीव्र निषेध नाेंदवू लागले आहेत.

साम न्यूज नेटवर्क

Saharanpur Kabbadi Tournament : उत्तर प्रदेश राज्यातील सहारनपूरमध्ये कबड्डी (kabbadi) स्पर्धेदरम्यान खेळाडूंना शाैचालयात जेवण दिल्याचे घटना समाेर आल्यानंतर देशभरातील क्रीडाप्रेमींनी (sports) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या भागात माेठा पाऊस पडल्यानं शाैचालयात जेवण तयार केल्याचे क्रीडा विभागानं मान्य केले. या प्रकरणी सहारनपूरचे क्रीडा अधिकारी अनिमेश सक्सेना यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे 17 वर्षाखालील मुलींच्या गटाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते. ही स्पर्धा तीन दिवसांच्या कालावधीची हाेती. या स्पर्धेसाठी शेकडाे खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक आले हाेते.

या स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंसाठी स्वच्छता गृहात (शौचालयात) शिजवलेले अन्न आणि कच्चा भात देण्यात आला. या स्पर्धेतील अन्न वाटपाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशातील क्रीडाप्रेमींत तीव्र नाराजी पसरली. समाज माध्यमातून (social Media) देखील या प्रकाराचा निषेध नाेंदविला गेला.

त्यानंतर क्रीडा अधिकारी अनिमेश सक्सेना यांना देखील याबाबत जाब विचारण्यात आला. त्यावर त्यांनी जेवण बनवताना भात खराब झाला. तो भात फेकून पुन्हा भात बनवला गेला. मात्र, स्वच्छतागृहात शिजवलेले अन्न मिळण्यावरून क्रीडा अधिकाऱ्यांनी वेगळाच युक्तिवाद केला. क्रीडा अधिकारी अनिमेश सक्सेना यांनी पावसामुळे जलतरण तलावा शेजारील चेंजिंग रुममध्ये खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते. कारण स्टेडियमच्या आजूबाजूला बांधकाम सुरू आहे असे म्हटलं. आम्ही चेंजिंग रुममध्ये अन्न शिजवण्याची व्यवस्था केली हाेती. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शाैचालयात जेवण देताना दिसत असल्याने सक्सेना यांची प्रशासनानं चाैकशी सुरु केली. त्यांना तूर्तास निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सहारनपूरचे जिल्हा दंडाधिकारी अखिलेश सिंह यांनी एडीएम वित्त आणि महसूल रजनीश कुमार मिश्रा यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या मोबाईल क्रमांकावर याबाबत बोलून पुराव्यासह अहवाल सादर करावा, असेही आदेश दिले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

SCROLL FOR NEXT