Shashi Tharoor On Team India Selection : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी गुरुवारी भारतीय संघाने मोठी घोषणा केली आहे. या दौऱ्यावर होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी सूर्यकुमार यादवची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर रोहित शर्मा वनडे संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे देणार आहे. दरम्यान झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माला संघात स्थान देण्यात आलेलं नाही .त्यामुळे फॅन्स भडकल्याचे पाहायला मिळाले आहे. यासह काँग्रेस नेत्याने देखील संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे.
चांगली कामगिरी करुनही अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांना संघाबाहेर करण्यात आलं आहे. संघाची घोषणा होताचा, काँग्रेस नेते शशी थरुर यांनी बीसीसीआयवर संपात व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे. आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या या फलंदाजाने २०२४ स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला होता. यासह झिम्बाब्वे दौऱ्यावर संधी मिळाल्यानंतर त्याने दुसऱ्याच सामन्यात शतक झळकावलं होतं. यशस्वी जयस्वाल संघात आल्यानंतर त्याला तिसऱ्या क्रमाकांवर खेळण्याची संधी मिळाली. या क्रमांकावर खेळतानाही त्याने संघासाठी महत्वपूर्ण धावा केल्या.
शशी थरुर यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की, ' या महिन्याच्या शेवटी होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. ही निवड खरंच खूप इंटरेस्टिंग निवड करण्यात आलीये. शेवटच्या वनडे सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या संजू सॅमसनला वनडे मालिकेतून डच्चू देण्यात आलाय. झिम्बाब्वेविरुद्ध शतकी खेळी करणाऱ्या अभिषेक शर्माला कुठल्याही मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेलं नाही.'
शशी थरुर यांनी भारतीय संघाच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांच्या मते देशासाठी कामगिरी करणाऱ्यांना कमी आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्यांना अधिक प्राधान्य दिलं जातं. त्यांनी लिहिले की, 'निवडकर्त्यांसाठी निळी जर्सी घालून शानदार कामगिरी करणारे कमी महत्वाचे आहेत. तरीही भारतीय संघाला शुभेच्छा.' असं लिहिलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.