Ajinkya rahane saam tv
Sports

Ajinkya Rahane: योगायोग की आणखी काही...; टीम इंडिया फ्लॉप ठरताच अजिंक्य रहाणेने केली सूचक पोस्ट, म्हणाला...!

Ajinkya Rahane: न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या सामनात टीम इंडियाची खराब कामगिरी पाहायला मिळाली. दरम्यान ४६ वर ऑलआऊट झाल्यानंतर अजिंक्य रहाणेची एक पोस्ट चर्चेचा विषय ठरतेय.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या न्यूझीलंड विरूद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये टेस्ट सिरीज सुरु आहे. यामध्ये पहिला टेस्ट सामना बंगळूरूच्या चिन्नस्वामी मैदानावर खेळवला जातोय. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांची अतिशय खराब कामगिरी पहायला मिळाली. किवींच्या गोलंदाजीसमोर टीम इंडियाचे फलंदाज अवघ्या ४६ रन्सवर ऑलआऊट झाले. दरम्यान यानंतर टीम इंडियाचा माजी उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ चर्चेचं कारण बनतोय.

बंगळुरू टेस्टचा पहिला दिवस पावसाने वाहून गेला. त्यामुळे सामन्याला दुसऱ्या दिवशी सुरुवात झाली. भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून यावेळी पहिल्यादा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय टीमसाठी फार धोकादायक ठरला. टीम इंडिया अवघ्या 46 धावांत ऑलआऊट झाली, जी घरच्या मैदानावरील त्याची सर्वात कमी धावसंख्या आहे.

टीम इंडिया फ्लॉप होताच रहाणेने पोस्ट केला व्हिडीओ

एकीकडे टीम इंडिया फेल ठरत असताना अचानक सोशल मीडियावर अजिंक्य रहाणेबाबत चर्चा सुरू झाली. एक वर्षाहून अधिक काळ अजिंक्य रहाणे टीम इंडियाच्या बाहेर आहे. अजिंक्यने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये तो फलंदाजीचा सराव करताना दिसतोय.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये रहाणेने लिहिलंय की, 'रेडी टू स्ट्राइक' म्हणजे खेळायला तयार. दरम्यान याच कारणाने रहाणे सोशल मीडियावर चर्चेत आला होता.

चाहत्यांनी टीम इंडियाला केलं ट्रोल

रहाणेच्या या व्हिडिओच्या टायमिंगला चाहत्यांनी टीम इंडियाच्या खराब कामगिरीशी जोडत थेट टीम इंडियाला ट्रोल केलं आहे. चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, रहाणेने जणू टीम इंडियाला चिडवण्यासाठी ही पोस्ट केलीये. दरम्यान हा एक योगायोग असून यापूर्वीही असं घडलं होतं.

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये पहिल्या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी अपयशी ठरली होती. त्यावेळीही रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने त्यांच्या प्रॅक्टिसचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केले होते. दरम्यान टीम इंडियाच्या खराब खेळीनंतर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांची नावं सोशल मीडियावर चर्चेत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

SCROLL FOR NEXT