बेंगळुरुच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा खराब खेळ पाहायला मिळाला. भारताचा संपूर्ण संघ ४६ धावांवर बाद झाला. दुसऱ्या दिवसाच्या अंती किवीच्या संघाने ३ विकेट गमावत १८० धावा केल्या. दुपारी झालेल्या खराब खेळानंतर संध्य़ाकाळी कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेत नेमकं काय चुकलं याची माहिती दिलीय. तसेच कमी स्कोअरवर अख्या संघ बाद होणं हे दुखदायक असल्याचं रोहित शर्माने म्हटलंय.
न्युझीलंडसोबत सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची अत्यंत खराब खेळ पाहायला मिळाला. टीम इंडियाच्या ९ खेळाडूंना दुहेरी आकडासुद्धा साधता आला नाही. केएल राहुलला सुद्धा चांगली फलंदाजी करता आली नाही. मात्र संघाचा कर्णधार रोहित शर्मा पूर्णपणे केएल राहुलच्या पाठीशी उभा असल्याचं दिसत आहे. राहुलने धावा झाल्या की नाही. सामन्यात राहुलने सरळ येणारा झेल सोडला तरी काही फरक पडत नाही, असं रोहित शर्माच्या बोलण्यातून दिसून आलं.
इतकंच नाही तर आज न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीच्या चुकीच्या निर्णयावरही रोहितला पश्चात्ताप झाला नाहीये. खेळ सुरू करण्यापूर्वी आणि खेळत असताना काही चुकीचे निर्णय घेतले गेल्याची कबुली रोहित शर्माने दिलीय.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात खुद्द रोहित शर्मासह संपूर्ण संघ मोठी कामगिरी न करता बाद झाला. तरी सर्वाधिक प्रश्न केएल राहुलवरच उपस्थित होताहेत. त्याला बऱ्याच दिवसांपासून धावा काढता आल्या नाहीत. तरीही तो टीम इंडियाच्या संघात खेळत आहे. त्यात रोहित शर्माने केएल राहुलबद्दल मोठी गोष्ट सांगितलीय. रोहित शर्मा केएलच्या फलंदाजीच्या क्रमांकावर जास्त खालीवर करण्यास इच्छित नाही. दरम्यान रोहित शर्मानेही भारतीय फलंदाजांची शॉट सिलेक्शन चांगली नसल्याची कबुली दिली. संघासाठी हा वाईट दिवस होता. कधीकधी तुम्हाला जे करायचे आहे ते मिळवता येत नसल्याचं शर्मा म्हणाला.
राहुलला सहाव्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे, त्यामुळे त्याला तेथे संधी देण्यात यावी. तसेच सफराज खानच्या बाबतीतही असेच आहे. आज विराट कोहली आज तिसऱ्या स्थानी फलंदाजी करण्यासाठी आला. त्यावर बोलतांना रोहित शर्माने सांगितलं की, विराट कोहली हा जबाबदारी घेणारा व्यक्ती आहे. संघासाठी ते चांगलं आहे. स्वतः कोहलीने येत फलंदाजी करणार असल्याचं सांगितलं. विराट कोहलीच्या फलंदाजीचा क्रम बदलला कारण विराट कोहलीने स्वतः हा निर्णय घेतला. विराट केएल राहुल आणि सरफराजला त्याच्या नंबरवरून हटवू इच्छित नसल्याचं रोहित शर्मा म्हणाला.
नाणेफेक जिंकून रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला? खेळपट्टी नीट समजली नाही का? असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावर रोहितने स्पष्ट शब्दात सांगितले की, एक कर्णधार म्हणून संपूर्ण संघ ४६ धावांवर बाद होताना पाहणे वेदनादायक आहे. परंतु नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय हा आपला स्वत: चा होता. एखाद्या वर्षात एक दोन चुकचे निर्णय होत असतात, असं रोहित शर्माने सांगितलं. तसेच रोहित शर्माने खेळपट्टी ओळखण्यात चूक झाल्याचे मान्य केलं. खेळपट्टी सपाट असेल ज्यामुळे फलंदाजांना मदत होईल असं वाटलं, पण झाले उलटे. तसेच सामन्यादरम्यान पंतच्या पायाला चेंडू लागला आणि त्याला मैदान सोडावे लागले. ज्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्याच पायाला चेंडू लागला. रोहितच्या म्हणण्यानुसार पंतच्या पायाला सूज आली असून त्याची दुखापत किती गंभीर आहे हे नंतर समजेल.
दरम्यान जेव्हा भारतीय संघ फलंदाजी करत होता. त्यावेळी खेळपट्टी ही कठीण असल्याचं जाणवत होतं. परंतु जेव्हा न्युझीलंडचा संघ फलंदाजीसाठी आला तेव्हा त्यांनी सरस पद्धतीने फलंदाजी केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्युझीलंडच्या संघाने १८० धावा करत १३४ धावांची आघाडी घेतली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.