chennai super kings official gives big update on ms dhoni retirement amd2000 twitter
Sports

MS Dhoni Retirement: धोनी निवृत्ती केव्हा घेणार? CSK च्या अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

MS Dhoni News In Marathi: चेन्नई सुपर किंग्ज संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आयपीएल २०२४ स्पर्धा झाल्यानंतर निवृत्ती जाहीर करणार अशी चर्चा सुरु होती.

Ankush Dhavre

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आयपीएल २०२४ स्पर्धा झाल्यानंतर निवृत्ती जाहीर करणार अशी चर्चा सुरु होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. असं म्हटलं जातंय की, हा एमएस धोनीचा आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान चेन्नई सुपर किंग्जच्या ऑफिशियल्सने धोनीबाबत मोठी अपडेट दिली आहे.

बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यानंतर फॅन्सला असं वाटतंय की, हा एमएस धोनीचा आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. मात्र धोनीने कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तो निवृ्त्तीचा निर्णय केव्हा घेणार हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

धोनी निवृत्ती केव्हा घेणार?

धोनी निवृ्त्ती केव्हा घेणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, चेन्नई सुपर किंग्जच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आह की, 'एमएस धोनीने निवृत्ती घेण्याबाबत चेन्नई सुपर किंग्ज संघाला काहीच सांगितलेलं नाही. त्याने टीम मॅनेजमेंटला आणखी काही महिने वाट पाहायला सांगितलं आहे. त्यानंतर तो निर्णय घेईल.'

चेन्नई सुपर किंग्ज संघातील एरिक सिमंस यांनी एमएस धोनीच्या निवृत्तीच्या बातम्यांना अफवा म्हटलं आहे. धोनी केव्हा निवृत्त होणार याबाबत चर्चा करणं मुर्खपणा आहे. धोनीला चांगलच माहित आहे की तो काय करतोय.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: भारतातील सर्वात लहान दोन अक्षरांचे नाव असलेले रेल्वे स्टेशन कोणते?

ITR Filling 2025: तुमच्या उत्पन्नानुसार निवडा आयटीआर फॉर्म! कोणासाठी कोणता फॉर्म योग्य? वाचा सविस्तर

Ranveer Singh : 'धुरंधर'चा जबरदस्त टीझर, रणवीर सिंहसोबत रोमान्स करणारी अभिनेत्री कोण? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : फ्रीवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Thakrey Brothers Vijayi Melava : अखेर तो क्षण आलाच! राज-उद्धव ठाकरे यांना एकत्र पाहून महिलेला अश्रू अनावर; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT