Cricketer wedding saam tv
Sports

Cricketer wedding: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अडकला लग्नाच्या बेडीत; वयाने 7 वर्ष मोठ्या मुलीसोबत बांधली लग्नगाठ

Ramandeep Singh wedding: ‘कैसी ये यारियां’ फेम अभिनेत्री चार्ली चौहानने क्रिकेटपटू रमनदीप सिंहसोबत गुपचूप लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. गुरुद्वारात पारंपरिक शीख पद्धतीने झालेल्या या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

‘कैसी ये यारियां’ या लोकप्रिय सिरीयलमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री चार्ली चौहान आता लग्नबंधनात अडकलीये. चार्लीने भारतीय क्रिकेटपटू रमनदीप सिंहसोबत गुपचूप लग्न केल्याची माहिती समोर आलीये. पंजाब किंग्सच्या सोशल मीडिया हँडलवर रमनदीप आणि चार्ली यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर या नवविवाहित जोडप्याचे लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतायत.

रमनदीप आणि चार्ली अडकले लग्नबंधनात

क्रिकेटपटू रमनदीप सिंह 29 वर्षांचा आहे. त्याने अभिनेत्री चार्ली चौहानसोबत खासगी पद्धतीने लग्न केलं. दोघांनी गुरुद्वारात पारंपरिक शीख पद्धतीने लग्न केल्याचं समोर आलं आहे. या विवाह सोहळ्याला दोघांचे जवळचे नातेवाईक, मित्र आणि कुटुंबातील मोजके सदस्य उपस्थित होते. मुख्य म्हणजे चार्ली चौहान रमणदीपपेक्षा तब्बल ७ वर्षांनी मोठी आहे.

रमनदीप आणि चार्लीच्या लग्नात क्रिकेटपटू अर्शदीप सिंहही सहभागी झाला होता. तो या लग्नात वरातीसोबत दिसला. विशेष म्हणजे चार्ली आणि रमनदीप यांनी आतापर्यंत त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे सांगितलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या लग्नाचे फोटो अचानक समोर आल्यानंतर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

लाल लेहंग्यात चार्लीचा ब्रायडल लूक

चार्ली चौहानने लग्नासाठी लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. या लेहंग्यावर सोनेरी रंगाचं आकर्षक वर्क करण्यात आलं होतं. लाल लेहंग्यासोबत चार्लीने गोल्डन मांगटिका, झुमर आणि नथ घातली होती. गळ्यात तिने त्याला साजेसा नेकलेसही घातला होता. हातात लाल चूडा घालून तिने आपला ब्रायडल लूक पूर्ण केला.

तर रमनदीप सिंहने आयव्हरी रंगाची शेरवानी परिधान केली होती. त्याच्या शेरवानीवरही हेवी वर्क करण्यात आलं होतं. त्याने डोक्यावर लाल रंगाची पगडी बांधली होती. लग्नाच्या फोटोंमध्ये चार्ली आणि रमनदीप एकमेकांसोबत रोमँटिक डान्स करतानाही दिसतायत. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे रंगलेले दिसून आले.

त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर चाहते आणि अनेक सेलिब्रिटी या नवविवाहित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

‘रोडीज’मधून झाली चार्लीच्या करिअरची सुरुवात

चार्ली चौहानच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर ती सर्वप्रथम एमटीव्ही रोडीजच्या सातव्या सीझनमध्ये दिसली होती. या शोमुळे तिला चांगली ओळख मिळाली. त्यानंतर चार्लीने ‘कैसी ये यारियां’ या सिरीयलमध्ये काम केलं आणि यामुळे ती प्रेक्षकांमध्ये अधिक लोकप्रिय झाली.

चार्लीने तिचा एक्स बॉयफ्रेंड कुंवर अमरसोबत ‘नच बलिए’ या डान्स रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता. मात्र, नंतर दोघांचं नातं तुटलं आणि त्यांचं ब्रेकअप झालं.

रमनदीप पंजाबकडून खेळतो

दुसरीकडे रमनदीप सिंह हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब संघाचं प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये तो शाहरुख खानच्या मालकीची टीम कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमचा भाग आहे. सध्या रमनदीप त्याच्या लग्नामुळे चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mosambi Juice Benefits for Skin: चमकदार आणि डागविरहीत त्वचेसाठी रोज प्या मोसंबीचा रस; जाणून घ्या आश्चर्यकारक सौंदर्य फायदे

जरांगे पाटलांचा सरकारला थेट अल्टिमेटम! 'या' १३ मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत रणांगण, पाहा संपूर्ण यादी

Maharashtra News Live Update: पुण्यातील गंज पेठ परिसरामध्ये दहीहंडीचे बॅनर रस्त्यावर कोसळले

Acicdent News : मध्यरात्री महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रकने ७ वाहनांना उडवले, ३ जणांचा मृत्यू, १० गंभीर

Cumin water: सलग 7 दिवस प्या जिऱ्याचं पाणी; होणारे फायदे पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

SCROLL FOR NEXT