Team India: टीम इंडियाचा कर्णधार बदलला; 'या' अनुभवी खेळाडूकडे सोपवली संघाची धुरा, वाचा काय आहे कारण?

Shubman Gill Injury: श्रीलंका XI विरुद्धच्या सराव सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. शुभमन गिलच्या उजव्या हाताच्या रिंग फिंगरला दुखापत झाली असून पहिल्या दिवशी तो मैदानात उतरलेला नाही. बीसीसीआयने त्याच्या दुखापतीबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
Team India
Team Indiasaam tv
Published On

भारत आणि श्रीलंका XI यांच्यातील तीन दिवसांच्या सराव सामन्याला आज सुरुवात झाली आहे. या सामन्यात श्रीलंका XI ने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सामना सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता. नियमित कर्णधार शुभमन गिल टॉससाठी मैदानावर उतरला नव्हता.

यानंतर बीसीसीआयने सोशल मीडियावरून शुभमन गिलच्या दुखापतीबाबत माहिती दिली. सरावादरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाल्याची चर्चा होती. अखेर सामन्यापूर्वी त्यावर बीसीसीआयने शिक्कामोर्तबही केलं. दरम्यान शुभमन गिलच्या अनुपस्थितीत केएल राहुलने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती.

Team India
Jasprit Bumrah: बुमराहच्या जागी २९ वर्षांच्या गोलंदाजाला मिळाली संधी, या कारणामुळे मिळाली संधी?

शुभमन गिलच्या बोटाला दुखापत

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सराव करताना शुभमन गिलच्या उजव्या हाताच्या रिंग फिंगरला दुखापत झाली. यावेळी शुभमनला श्रीलंका XI विरुद्धच्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानात उतरवण्यात आलं नाही. बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.

बीसीसीआयने काय दिलं स्पष्टीकरण?

बीसीसीआयने स्पष्ट केलंय आहे की, शुभमन गिल सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावर उतरलेला नाही. अशाचवेळी टीम इंडिया फलंदाजीला आल्यावर तो खेळताना दिसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

या खेळपट्टीमुळे भारताची निराशा?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची टेस्ट सिरीज 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या सिरीजसाठी श्रीलंका स्पिनर्स गोलंदाजांना मदत मिळेल अशी खेळपट्टी बनवण्याच्या तयारीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय फलंदाजांना श्रीलंकेच्या स्पिनर्स गोलंदाजांविरुद्ध सराव करता यावा यासाठी या सामन्याचं आयोजन करण्यात आलंय.

या सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी पाहता टीम इंडिया फारशी समाधानी नसल्याची चर्चा आहे. खेळपट्टीवर भरपूर हिरवं गवत असल्याने ती वेगवान गोलंदाजांना अधिक साथ देणारी आहे. अशा प्रकारच्या खेळपट्ट्या प्रामुख्याने SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे ना भारतीय फलंदाजांना अपेक्षित फिरकीचा सराव मिळणार, ना गोलंदाजांना स्पिनसाठी अनुकूल परिस्थितीत तयारी करण्याची संधी मिळणार आहे.

Team India
Shakib Al Hasan: माजी कर्णधार शाकिब अल हसनच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; दगडफेकीनंतर आग लावण्याचाही प्रयत्न, नेमकं काय घडलं?

कशा आहेत दोन्ही टीम्स?

श्रीलंका XI

निशान मदुश्का, पसिंदू सोरियाबंदरा, पवन रथनायके, अहान विक्रमसिंघे, सोनल दिनुशा (कर्णधार), अंजला बंदारा (विकेटकीपर), निपुण धनंजय, लाहिरू कुमारा, विश्व फर्नांडो, असंका मनोज, इसिता विजेसुंदरा, रमेश मेंडिस, दिलुम सुदीरा, केशर नुवांथा, रविंदू रसंथा.

Team India
Ind vs Pak : भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा महामुकाबला! कधी आणि कुठे रंगणार सामना?

कशी आहे टीम इंडिया?

शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, केएल राहुल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, मानव सुथार, सारांश जैन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, औकिब नबी, गुरनूर ब्रार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com