CPL 2021 चे नवीन नियम; प्रेक्षकांच्या सुरक्षेची सोडली नाही कसर Twitter/ @CPL
क्रीडा

CPL 2021 चे नवीन नियम; प्रेक्षकांच्या सुरक्षेची सोडली नाही कसर

कोविड महामारी (Coronavirus) लक्षात घेऊन, सीपीएलने सामने खेळणारे खेळाडू आणि चाहत्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही.

वृत्तसंस्था

कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL 2021) आणि सेंट किट्स आणि नेविस आरोग्य अधिकाऱ्यांनी 2021 स्पर्धेसाठी प्रोटोकॉल आणि नवीन नियम जाहीर केले आहेत. कोविड महामारी (Coronavirus) लक्षात घेऊन, सीपीएलने सामने खेळणारे खेळाडू आणि चाहत्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. 26 ऑगस्ट (गुरुवार) पासून स्पर्धेचा 9 वा हंगाम सुरू होणार आहे.

कोरोना १० नियम जे पाळणे बंधनकारक आहे

१) केवळ लसीकरण केलेल्या प्रेक्षकांनाच स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येकाने आपले लसीकरण झालेले प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक असणार आहे.

२) परदेशातील पूर्णपणे लसीकरण केलेल्या प्रेक्षकांना सीपीएल सामन्यांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. परंतु सेंट किट्स आणि नेविसमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला कोरोना प्रोटोकॉल, चाचणी आणि विलगिकरण प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे.

३) 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या प्रेक्षकांना पूर्ण लसीकरण झालेल्या प्रौढ व्यक्तीसह प्रवेश दिला जाणार आहे.

४) कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि डेटा संकलनामुळे बॉक्स ऑफिसवर रांगा टाळण्यासाठी प्रेक्षकांना अगोदरच ऑनलाइन तिकिटे खरेदी करण्यास सांगितले आहे.

५) प्रेक्षकांना सामन्याच्या थोडा वेळ अगोदर पोहचण्यास सांगितले आहे जेणेकरून गेटवरील कर्मचारी लसीकरणाची स्थिती तपासू शकतील. चाहत्यांनी त्यांचे कोविड-१९ लस प्रमाणपत्र आणि वैध फोटो आयडी कार्ड आणणे आवश्यक आहे.

६) ज्या प्रेक्षकांजवळ सरकारने जारी केलेले प्रमाणपत्र असेल त्यांना फास्ट-ट्राक मार्गाने सोडले जाणार आहे.

७) सामन्याच्या दिवशी वापरण्यात येणारे प्रत्येक स्टँड सामान्य क्षमतेच्या 50 टक्के भरले जाणार आहेत.

८) प्रवेश करताना मास्क लावणे आवश्यक आहे. आणि हा मास्क संपुर्ण सामना संपेपर्यंत लावणे बंधनकारक असणार आहे.

९) वॉर्नर पार्कच्या सभोवताल हँड सॅनिटायझेशन स्टेशन बसवले जाणार आहेत.प्रेक्षकांना दिवसभर वारंवार त्यांचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जाणार आहे.

१०) चाहत्यांनी जबाबदारीने वागावे आणि शक्य असेल तेथे सामाजिक अंतर राखावे पाळवे असे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे ४००० मतांनी आघाडीवर

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT