आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून युएई सुरू होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK vs MI) आणि मुंबई इंडियन्सचा संघ दुसऱ्या टप्प्यातला पहिला सामना खेळणार आहे. सध्या पॉइंट टेबलमध्ये सीएसके दुसऱ्या आणि मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. यावेळी चेन्नईच्या संघाने गेल्या टप्प्यात चांगली कामगिरी करून प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा कायम ठेवली आहे. आयपीएलसाठी यूएईला पोहोचणारा चेन्नईचा संघ पहिला आहे. संघाने विरगिकरण कालावधी पुर्ण केला आहे, आणि मैदानावर सराव देखील सुरू केला आहे. दरवेळी प्रमाणेच चाहते धोनीची फलंदाजी पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
गेल्या वर्षी धोनीने १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून संन्यास घेतला आहे. पण चाहत्यांना माहीला मैदानावर खेळताना पाहायचे आहे. गेल्या मोसमात धोनीची बॅट शांत होती. त्याचबरोबर त्याने या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात विशेष काही केलेले नाही. धोनीने या हंगामात ७ सामन्यात ३७ धावा केल्या आहेत. पण आता दुसऱ्या टप्प्यात धोनी नव्या रूपात आणि नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे.
सराव सत्रादरम्यान त्याने फलंदाजीची झलक दाखवली आहे. धोनी फलंदाजीचा सराव करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात माही गोलंदाजांविरुद्ध लांब षटकार मारताना दिसत आहे. फलंदाजी करताना धोनी त्याच्या जुन्या शैलीत दिसत आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.