मेलबर्नमध्ये सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने टेस्ट क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. त्याने कसोटीत 200 विकेट्स पूर्ण केले आहेत. 20 पेक्षा कमी सरासरीने ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.
मेलबर्न टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेडची विकेट घेत जसप्रीत बुमराहने या हा इतिहास रचला आहे. हेड बुमराहच्या कारकिर्दीतील 200 वा बळी ठरला आहे. बुमराहने केवळ 200 वी विकेट घेऊन इतिहास रचला नाही तर हेडच्या 31 व्या वाढदिवसाचे तीन-तेराही वाजवले.
आज ट्रेविस हेडचा वाढदिवस आहे. ट्रॅव्हिस हेड 29 डिसेंबर 2024 रोजी 31 वर्षांचा झालाय. इतक्या खास दिवशी ऑस्ट्रेलियाला हेडकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र मेलबर्नमध्ये त्याला चांगला खेळ करता आला नाही. पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही डावात बुमराहने हेडला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 31व्या वाढदिवसाला फलंदाजीला आलेल्या हेडला केवळ 1 रन करता आला.
हेडच्या वाढदिवसाच्या मजेचा बुमराहने बेरंग केला. जसप्रीत बुमराह हा टेस्ट क्रिकेटमध्ये 200 विकेट्स घेणारा भारताचा सहावा गोलंदाज आहे. पण हा टप्पा सर्वात जलद गाठणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. 20 पेक्षा कमी सरासरीने 200 टेस्ट विकेट्स घेणारा तो जगातील एकमेव गोलंदाज आहे. बुमराहने कसोटीत 19.38 च्या सरासरीने 200 बळी घेतले आहेत.
बुमराहने टेस्ट क्रिकेटमधील 84 व्या डावात 200 विकेट्स पूर्ण केले. त्याने ही अप्रतिम कामगिरी मेलबर्नच्या मैदानावर पू्र्ण केली. या ठिकाणी आता त्याच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.