kieron pollard and hardik pandya google
क्रीडा

Kieron Pollard: कायरन पोलार्ड बनला मुंबईचा नवा कर्णधार! आगामी हंगामापूर्वी दिग्गज खेळाडू स्पर्धेतून बाहेर

Ankush Dhavre

Mumbai Indians Cape town New Captain:

आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्स संघात मोठे फेरबदल पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेचा लिलाव होण्यापूर्वी मुंबईने हार्दिकला १५ कोटी रुपयात ट्रेड करत आपल्या संघात स्थान दिले होते. त्यानंतर रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून हार्दिकला संघाचा कर्णधार बनवण्यात आलं. दरम्यान दक्षिण आफ्रिका टी-२० लीग सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स केपटाऊनने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.

आगामी दक्षिण आफ्रिका टी-२० लीग स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स केपटाऊन संघाची जबाबदारी कायरन पोलार्डकडे सोपवण्यात आली आहे. गतवर्षी राशिद खान या संघाचा कर्णधार होता. मात्र राशिद खान दुखापतग्रस्त असल्याने ही जबाबदारी कायरन पोलार्डकडे सोपवण्यात आली आहे. (Kieron Pollard New Captain Of Mumbai Indians Cape Town)

मुंबई इंडियन्स केपटाऊनच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांनी लिहीले की,' राशिद खान सध्या खेळू शकणार नाही. कारण तो दुखापतीतून पूर्णपणे सावरु शकलेला नाही. त्यामुळे कायरन पोलार्ड हा MI केपटाऊन संघाचा कर्णधार असणार आहे. आम्ही अशी प्रार्थना करतो की, राशिद लवकर फिट होऊन मैदानावर कमबॅक करेल. ' (Latest sports updates)

कायरन पोलार्ड आयपीएलच्या सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. त्याने ५ वेळेस आयपीएल विजेत्या, २ वेळेस CLT20 विजेता आणि एक वेळेस MLC स्पर्धेच्या विजेत्या मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

एमआय एमिरेट्स संघाचा कर्णधारही बदलला..

आतंरराष्ट्रीय टी-२० लीग आणि दक्षिण आफ्रिका टी-२० लीग या दोन्ही स्पर्धा एकाच कालावधीत खेळल्या जाणार आहेत. त्यामुळे आतंरराष्ट्रीय टी-२० लीग स्पर्धेसाठी एमआय एमिरेट्स संघाचा कर्णधार बदलण्यात आला आहे.या स्पर्धेतील आगामी हंगामात निकोलस पुरन एमआय एमिरेट्स संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसून येणार आहे. दक्षिण आफ्रिका टी-२० लीग स्पर्धेला येत्या १० जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. तर आतंरराष्ट्रीय टी-२० लीग स्पर्धेला १९ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT