team india news
team india newsgoogle

Team India News: बुमराह,जडेजा अन् सिराजला संघाबाहेर का ठेवलं? समोर आलं मोठं कारण

India vs Afghanistan: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी -२० मालिकेचा बिगुल वाजला आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
Published on

India vs Afghanistan, Team India Squad:

भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी -२० मालिकेचा बिगुल वाजला आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही कमबॅक करताना दिसून येणार आहेत. दोघेही टी -२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेनंतर टी -२० संघातून बाहेर होते. दरम्यान मोहम्मद सिराज , जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा यांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.

ज्यावेळी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण या संघात मोहम्मद सिराज, रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांचं नव्हतं. या खेळाडूंना संघातून ड्रॉप करण्यात आलेलं नाही, तर विश्रांती देण्यात आली आहे.

हे तिन्ही खेळाडू संघातील प्रमुख खेळाडू आहेत. टी -२० मालिका झाल्यानंतर भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेच्या दृष्टीने या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर मोहम्मद शमी अजूनही पूनरोणे फिट होऊ शकलेला नाही. त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. (Latest sports updates)

team india news
IND vs AFG: टीम इंडियाची प्लेइंग ११ ठरली! अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० साठी या ११ खेळाडूंना मिळू शकते संधी

जसप्रीत बुमराहने आशिया कप २०२३ स्पर्धेतून दमदार कमबॅक केलं होतं. त्याला पूर्ण एक वर्ष दुखापतीमुळे संघाबाहेर राहावं लागलं होतं. त्याने आशिया कप स्पर्धेनंतर वर्ल्डकप आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला आगामी कसोटी मालिका पाहता विश्रांती देण्यात आली आहे.

रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज हे दोघेही संघाचा एक प्रमुख भाग आहेत. या दोघांनाही वर्कलोड मॅनेज करण्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. हे दोन्ही खेळाडू इंग्लंड इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसून येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com