pakistan cricket team twitter
Sports

World Cup Points Table: बांगलादेशच्या पराभवानं पाकिस्तानला मोठा धक्का! वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतून पॅकअप

World Cup 2023 Points Table: या पराभवानंतर पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

Ankush Dhavre

World Cup 2023 Points Table:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत आणखी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. नेदरलँडने बांगलादेशवर ८७ धावांनी विजय मिळवला आहे. या पराभवानंतर बांगलादेशचे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत.

तर नेदरलँडने बलाढ्य दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशला पराभूत करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. दरम्यान या सामन्यानंतर कशी आहे पॉईंट्स टेबलची स्थिती जाणून घ्या.

नेदरलँडने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण ६ सामने खेळले आहेत. यापैकी २ सामने जिंकण्यात त्यांना यश आलं आहे. तर २ सामने गमवावे लागले आहेत. ४ पॉइंट्ससह हा संघ पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे.

तर गतविजेता इंग्लंडचा संघ या यादीत सर्वात शेवटी म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडने ५ सामन्यांमध्ये केवळ २ गुणांची कमाई केली आहे. शाकीब अल हसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा बांगलादेशचा संघ या यादीत नवव्या स्थानी आहे. बांगलादेशने आतापर्यंत केवळ १ सामना जिंकला आहे. (Latest sports updates)

रविवारी डबल हेडर सामन्यांचा थरार पार पडला. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर विजय मिळवला आहे. या पराभवानंतरही न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी कायम आहे. न्यूझीलंडचे ६ सामन्यांमध्ये ८ पॉइंट्स आहेत.

तर ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या स्थानी कायम आहे. ऑस्ट्रेलियाचे देखील ६ सामन्यांमध्ये ८ पॉइंट्स आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ या यादीत अव्वल स्थानी कायम आहे. दक्षिण आफ्रिकेने ६ पैकी ५ सामने जिंकले आहेत. तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ५ पैकी ५ सामने जिंकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : पात्र आहात पण खात्यावर ₹१५०० येत नाहीत? लाडक्या बहिणींनो हे काम आताच करा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शरद पवार सरसावले! 'या' शहरासाठी 'इतक्या' लाखांची मदत|VIDEO

Maharashtra News Live Update: जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंदणी करा; गडचिरोलीत भव्य ओबीसी मोर्चा

Ramayana Movie Advance Booking: दिवाळीपूर्वीच 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर धमाका;  ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यावधींचा टप्पा केला पार

पोलीस कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड; ४६ अंमलदारांना मिळाली पदोन्नती, सातारा पोलीस दलात मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT