IND vs ENG: हार्दिकच्या जागी टीम इंडियात नव्या ऑल राऊंडरची एन्ट्री! फलंदाजीसह गोलंदाजीतही देणार योगदान

Virat Kohli Bowling In Nets: विराट कोहली गोलंदाजी करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
virat kohli bowling
virat kohli bowling twitter
Published On

Virat Kohli Bowling In Nets:

भारतीय संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पुढील सामन्यात इंग्लंडविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. हा सामना २९ ऑक्टोबर रोजी लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसून आला आहे.

कोहली ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ते पाहता असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या सामन्यात तो फलंदाजीसह गोलंदाजी करतानाही दिसून येऊ शकतो. कारण संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.

बांगलादेशविरूद्ध झालेल्या सामन्यात गोलंदाजी करत असताना हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाला होता. या सामन्यात चेंडू टाकल्यानंतर फॉलो थ्रुमध्ये त्याचा पाय मुरगळला होता. त्यामुळे तो न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात खेळताना दिसून आला नव्हता. आता पुढील सामन्यातही त्याचं खेळणं कठीण दिसून येत आहे.

virat kohli bowling
Jos Buttler Statement: इंग्लंडच्या पराभवानंतर कर्णधार जोस बटलर अक्षरश: रडला; म्हणाला,'प्रामाणिकपणे सांगतो..'

विराट करणार गोलंदाजी?

हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याला मैदान सोडावं लागलं होतं. त्याचं षटक पूर्ण करण्याची जबाबदारी विराट कोहलीकडे सोपवण्यात आली होती. आता इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी विराट रोहित शर्मा आणि शुभमन गिलला नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसून आला आहे. त्यामुळे इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या सामन्यात तो फलंदाजीसह गोलंदाजीही करणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. (latest sports updates)

virat kohli bowling
Eden Gardens Stadium: वर्ल्डकप सामन्यापूर्वी मोठी दुर्घटना! ईडन गार्डन्स स्टेडियमची भिंत कोसळली; नेमंक काय घडलं?

३ फिरकी गोलंदाजांसह उतरणार मैदानात?

हा सामना लखनऊच्या मैदानावर रंगणार आहे. या मैदानावरील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ ३ फिरकी गोलंदाजांसह मैदानावर उतरू शकतो. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे फिक्स गोलंदाज आहेत. तर आर अश्विनला या सामन्यासाठी संघात स्थान दिले जाऊ शकते.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com