पोलीस कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड; ४६ अंमलदारांना मिळाली पदोन्नती, सातारा पोलीस दलात मोठा निर्णय

Satara Police Department: सातारा पोलीस विभागाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ४६ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. या पदोन्नतीमध्ये २४ पोलीस उपनिरीक्षक, ११ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि ११ हेड कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे.
Satara Police Department has promoted 46 police personnel ahead of Diwali
Satara Police Department has promoted 46 police personnel ahead of Diwalisaam tv
Published On: 
Summary
  • सातारा जिल्हा पोलीस दलातील ४६ पोलीस अंमलदारांना पदोन्नती

  • पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पदोन्नतीची घोषणा

  • २४ सहायक पोलीस उपनिरीक्षकांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलीय, त्याआधी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी हाती आलीय. सातारा जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील एकूण ४६ पोलीस अंमलदारांना पदोन्नती देण्यात आलीय. यामध्ये २४ जणांना श्रेणी उपनिरीक्षक, तर उर्वरितांना सहायक उपनिरीक्षक आणि हवालदार पदी बढती मिळालीय. ४६ पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी विविध पदांवर पदोन्नती जाहीर केली.

Satara Police Department has promoted 46 police personnel ahead of Diwali
Police Officer Transfer: 14 पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पोलीस विभागात मोठा फेरबदल

यामध्ये २४ सहायक पोलीस उपनिरीक्षकांना 'श्रेणी पोलीस उपनिरीक्षक' ११ पोलीस हवालदारांना 'सहायक पोलीस उपनिरीक्षक' आणि ११ पोलीस नाईक व शिपायांना 'पोलीस हवालदार' पदी बढती देण्यात आली. पदोन्नती मिळालेल्या सर्व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि पोलीस उपअधीक्षक कृष्णकुमार जाधव यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

गृहविभाग आणि अप्पर पोलीस महासंचालकांच्या निर्देशानुसार विहित अटींच्या अधीन राहून ही पदोन्नती देण्यात आलीय. यामध्ये सातारा जिल्हा पोलीस दलाच्या स्थापनेवरील २४ सहायक पोलीस उपनिरीक्षकांना ‘श्रेणी पोलीस उपनिरीक्षक’ (ग्रेड पीएसआय) पदावर बढती देण्यात आली.

Satara Police Department has promoted 46 police personnel ahead of Diwali
पुण्यात १४ पोलिसांसह २५ जणांना अटक, काय आहे प्रकरण? पोलीस दलात खळबळ

हवालदार आणि सहायक उपनिरीक्षक पदी पदोन्नती

सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार ११ पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच, ११ पोलीस नाईक व शिपायांना पोलीस हवालदार पदावर बढती मिळालीय. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि गृह विभागाचे उपअधीक्षक कृष्णकुमार जाधव यांनी पदोन्नती मिळालेल्या सर्व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.