दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शरद पवार सरसावले! 'या' शहरासाठी 'इतक्या' लाखांची मदत|VIDEO

Sharad Pawar 50 Lakh Donation For Solapur Drought Relief: सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दुष्काळ निवारणासाठी ५० लाख रुपयांचा धनादेश दिला. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे धनादेश सुपूर्द करत जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्याच्या सूचना दिल्या.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीसाठी 50 लाख रुपयांचा धनादेश खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे दिला आहे. सदर धनादेश जिल्हाधिकाऱ्याकडे देण्याची सूचना त्यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदी 16 तारखेला बारामतीमध्ये येणार आहेत. त्यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे हे आमच्या पक्षाकडून राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडतील. मी राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा पाहणी दौरा करत आहे. हा दौरा झाल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, आणि शक्य झालं तर पंतप्रधानांना भेटून ही माहिती त्यांच्यापुढे सादर करणार आहे. असे आश्वासन शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिले. राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या बाधावर जाऊन परिस्थिती जाणून घेतली. आज ते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.