Ramayana Movie Advance Booking: दिवाळीपूर्वीच 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर धमाका;  ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यावधींचा टप्पा केला पार

Ramayana Movie Advance Booking Collection: 'रामायण' चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंगमध्ये तुफान कमाई केली आहे. प्रदर्शनापूर्वीच जगभरात ४० कोटींचा टप्पा पार केला आहे.
Ramayana Movie Advance Booking
Ramayana Movie Advance BookingSaam t
Published On: 

'रामायण' चित्रपटाची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. चित्रपटामध्ये इंडस्ट्रातील अनेक मोठे कलाकार दमदार भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेता रणबीर कपूर श्रीरामाच्या भूमिकेत तर अभिनेत्री साई पल्लवी ही सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अभिनेता यश हा रावणांच्या भूमिकेत दिसणार आहे त्यामुळेच या चित्रपटांची उत्सुकता वाढली आहे.

आत्तापर्यंतची 40 कोटींहून अधिक कमाई

येत्या 5 नोव्हेंवरला दिवाळीपूर्वी चित्रपट सिनेमागृहात रिलीज होणार आहे.सध्या या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे. सुरूवातीला हिंदी भाषेतील या चित्रपटाची बुकिंग जोरदार सुरू होती. मात्र आता कन्नड, तेलुगु आणि तमिळ भाषांमधील शोंना देखील प्रंचड प्रतिसाद मिळत आहे. यामुळे या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच मोठी कमाई केली आहे. नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार, रामायण चित्रपटाने आतापर्यंतच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 40 कोटींचा टप्पा पार कला आहे.

Ramayana Movie Advance Booking
Ajay Devgn: गुटखा जाहिरात प्रकरणी अजय देवगणच्या अडचणी वाढल्या? थेट हायकोर्टात धाव, नेमकं कारण काय?

सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, 31 ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार भारतात या चित्रपटाने अॅडवान्स बुकिंगमध्ये 16.5 कोटी रूपयांचा ग्रॉस व्यवसाय केला. या काळात तीन लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाली. देशभरात या चित्रपटाचे जवळपास 2,500 स्क्रिन मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. सुरूवातीला हिंदी भाषेतील 'शो' ची बुकिंग मोठ्या प्रमाणात सुरू होती. मात्र आता कन्नड, तेलुगु आणि तमिळ भाषांमधील शोदेखील वाढत्या प्रतिसादामुळे वाढवण्यात आले आहेत.

Ramayana Movie Advance Booking
Famous Director Death: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; बाथरुममध्ये पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू

'रामायण' परदेशात प्रचंड यशस्वी ठरला आहे. सशुल्क प्रिव्ह्यूच्या 24 तासांच्या आतच चित्रपटाच्या कमाईत 27 टक्क्यांनी वाढ झाली. शुक्रवारपर्यंत, चित्रपटाने परदेशातून आगाऊ बुकिंगद्वारे 2.5 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली होती, ज्यापैकी १ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कमाई एकट्या अमेरिकेतील सशुल्क प्रिव्ह्यूमधून झाली होती. अशाप्रकारे, प्रदर्शनाच्या अवघ्या पाच दिवस आधीच, 'रामायण'ने जगभरातील आगाऊ बुकिंगमधून 40 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.