hardik-pandya saam tv news
Sports

Hardik Pandya News: गुजरातच्या हार्दिकचे मुंबईत पुनरागमन! आगामी IPL हंगामात रोहित, बुमराहसोबत एकत्र खेळताना दिसणार

Hardik Pandya In Mumbai Indians: आयपीएल २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेसाठीचा लिलाव सोहळा येत्या १९ डिसेंबर रोजी दुबईत रंगणार आहे. या लिलावापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे.

Ankush Dhavre

Hardik Pandya Mumbai Indians:

आयपीएल २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेसाठीचा लिलाव सोहळा येत्या १९ डिसेंबर रोजी दुबईत रंगणार आहे. या लिलावापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. गुजरात टायटन्सने हार्दिक पंड्याला रिलीज केलं आहे. तसेच तो आता मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. तो आगामी हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडियावर याबाबत माहिती देण्यात आली आहे.

गेली काही वर्षे मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सने रिलीज केले होते. त्यानंतर त्याला गुजरात टायटन्सने आपल्या ताफ्यात स्थान देत कर्णधारपद दिलं होतं. या संघाचं नेतृत्व करत त्याने पहिल्याच हंगामात गुजरातला चॅम्पियन बनवलं होतं. त्यानंतर दुसऱ्या हंगामात गुजरातचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता. मुंबई इंडियन्सने त्याला १५ कोटी रुपयांना ट्रेड केले आहे. (Latest sports updates)

हार्दिक पंड्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्स संघातून केली होती. २०१५ मध्ये झालेल्या लिलावात मुंबईने त्याला १० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. २०१५ पासून ते २०२१ पर्यंत त्याने या संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर २०२२ च्या लिलावात मुंबईने त्याला रिलीज केलं होतं. हीच संधी साधत गुजरातने त्याला आपल्या संघात स्थान दिलं. आता पुन्हा एकदा तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना दिसेल.

अशी आहे कारकिर्द..

हार्दिक पंड्याने २०१५ पासून ते २०२१ पर्यंत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केलं. यादरम्यान त्याने ९२ सामने खेळले. ८५ डावांत त्याने १४७६ धावा चोपल्या. ९१ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. मुंबईकडून खेळताना त्याने ९७ चौकार आणि ९८ षटकार मारले. त्याने गोलंदाजीतही मोलाचं योगदान दिलं आहे. त्याने ६० डावांमध्ये ४२ गडी बाद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Jalgaon : अंगावर काटा आणणारी घटना! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Chief Minister Salary : राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळतो?

Madison Square Garden: न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलं

Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT