Jasprit Bumrah Test Retirement x
Sports

Jasprit Bumrah Retirement : टीम इंडियाला मोठा हादरा! जसप्रीत बुमराह कसोटीतून निवृत्ती घेणार?

Jasprit Bumrah Test Retirement : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या भारत विरुद्ध इंग्लंड मँचेस्टर कसोटी खेळत आहे. या कसोटी सामन्यादरम्यान त्याच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरु झाली आहे.

Yash Shirke
  • जसप्रीत बुमराह कसोटीतून निवृत्ती घेणार?

  • शरीर साथ देत नसल्याने लवकरच करणार निवृत्तीची घोषणा

  • निवृत्तीच्या चर्चांमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

Test Retirement : भारतीय क्रिकेट संघातील स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जात आहे. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेमध्ये जसप्रीत बुमराहने चांगली कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तो पूर्णपणे सक्रीय आहे. पण जसप्रीत बुमराह लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने बुमराह कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो असे म्हटले आहे. कैफने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने बुमराहच्या निवृत्तीसंबंधित मोठा दावा केला आहे. 'येत्या काळात बुमराह कसोटी क्रिकेट सोडू शकतो. तो त्याच्या शरीराशी संघर्ष करत आहे, त्यामुळे त्याला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागू शकते', असे मोहम्मद कैफने म्हटले आहे.

व्हिडीओमध्ये मोहम्मद कैफ 'भारत विरुद्ध इंग्लंड मँचेस्टर कसोटीमध्ये त्याचा वेग दिसला नाही. तो खूप स्वाभिमानी आहे, जर आपण १०० टक्के देऊ शकत नाही, विकेट घेऊ शकत नाही, असे त्याला वाटले. तर तो स्वत:हून खेळण्यास नकार देईल. बुमराहला विकेट मिळो की नको मिळो, तो १२५-१३० च्या वेगाने गोलंदाजी करत होता. ज्या चेंडूवर त्याला विकेट मिळाली. त्या चेंडूवर कीपरला पुढे जाऊन कॅच घ्यावा लागला', असे म्हणाला.

'बुमराहमध्ये जोश आहे, तो कसोटी क्रिकेटसाठी सर्वकाही करत आहे. पण त्याने फिटनेस गमावला आहे. त्याचे शरीर त्याला साथ देत नाहीये. यामुळे येत्या काळात भारतीय संघाला अडचणींना सामना करावा लागू शकतो, असे मला वाटते. सुरुवातीला विराट, रोहित आणि अश्विन कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले. आता चाहत्यांना बुमराहशिवाय भारतीय संघाला पाहण्याची सवय करावी लागेल', असे वक्तव्य मोहम्मद कैफने केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT