
Ind vs Eng Joe Root : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड या स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यामध्ये इंग्लंडच्या जो रूटने तुफान खेळी केली आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावामध्ये त्याने १५० धावा झळकावल्या आहेत. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडच्या संघाला धावांची मोठी आघाडी मिळाली आहे.
मँचेस्टरमध्ये भारत विरुद्ध खेळताना जो रूटने अनेक विक्रम मोडले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळांडूमध्ये जो रूट दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत त्याने ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंगला मागे टाकले आहे. कसोटीमध्ये सर्वाधित धावा करणारा जो रूट हा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे.
सचिन तेंडुलकर यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. २०० कसोटी सामन्यात त्यांनी १५,९२१ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने १६७ कसोटी सामन्यांमध्ये १३,३७६ धावा केल्या आहेत. सध्या कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत सचिन तेंडुलकर प्रथम, जो रूट द्वितीय आणि रिकी पॉन्टिंग तृतीय क्रमांकावर आहे. जो रूट जर अशाच प्रकारे फलंदाजी करत राहिला तर तो लवकरच सचिन तेंडुलकर यांचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम मोडित काढेल असे म्हटले जात आहे.
मँचेस्टर कसोटीमध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकला. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. ३५८ धावांवर भारताचा संघ ऑलआउट झाला. त्यानंतर इंग्लंडचे फलंदाज मैदानात उतरले. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी इंग्लंडचे फलंदाज भारताच्या गोलंदाजांवर वरचढ ठरले. सध्या पहिल्या डावात इंग्लंडचा संघ १४१ धावांनी आघाडीवर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.