Ben Stokes vs Siraj : सिराजचा घातक चेंडू, बेन स्टोक्स व्हिवळला! थेट गुडघ्यावर बसला; पुन्हा उठताच येईना, VIDEO

Ben Stokes collapses VIDEO : मोहम्मद सिराजने फेकलेला चेंडू बेन स्टोक्सच्या थेट बॉक्स अर्थात एब्डोमिनल गार्डवर आदळला. त्यानंतर स्टोक्स थेट क्रिसमध्येच गुडघ्यावर बसला. इंग्लंड क्रिकेटच्या एक्स हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
Stokes vs Siraj :  सिराजचा चेंडू स्टोक्सच्या ग्रोइन एरियावर आदळला, थेट मैदानातच बसला, VIDEO
Ben Stokes collapses on the ground after Siraj smashes himsaam tv
Published On
Summary
  • मँचेस्टर कसोटीत मोहम्मद सिराजचा स्टोक्सला दणका

  • सिराजनं फेकलेला चेंडू स्टोक्सच्या ग्रोइन एरियावर आदळला

  • वेदनेने व्हिवळत स्टोक्स थेट मैदानावरच बसला

  • मँचेस्टर कसोटीतील मैदानावरचा व्हिडिओ व्हायरल

मोहम्मद सिराज आणि बेन स्टोक्सची मैदानातील 'ठस्सन' प्रेक्षकांना काही नवीन नाही. सिराज जेव्हा गोलंदाजीला येतो तेव्हा 'तुफान' घेऊन येतो हे आतापर्यंत बेन स्टोक्सच्या डोक्यात गेलं नसेल तरच नवल! तिसऱ्या कसोटी सामन्यात जो प्रसंग घडला त्याचीच पुनरावृत्ती चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मैदानात घडली. सिराजनं फेकलेला चेंडू बेन स्टोक्सच्या थेट ग्रोइन एरियावर जाऊन जोरात आदळला. त्यानंतर बेन स्टोक्स वेदनेनं व्हिवळू लागला. तो थेट मैदानावरच गुडघ्यावर बसला.

मँचेस्टर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी (India vs England 4th Test, 3rd day) बेन स्टोक्ससोबत जे घडलं ते बघून सामना तल्लीन होऊन सामना पाहणारा प्रत्येक इंग्लिश फॅन 'अरेरे' अशी प्रतिक्रिया देत मैदानात नेमकं काय घडलं याचा कानोसा घेऊ लागला. कारण मोहम्मद सिराजनं फेकलेला चेंडू स्टोक्सच्या ग्रोइन एरियावर लागला. त्यानंतर स्टोक्स मैदानावरच गुडघ्यावर बसला. त्याच्या चेहऱ्यावर होणाऱ्या वेदना स्पष्ट दिसत होत्या. बेन स्टोक्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Stokes vs Siraj :  सिराजचा चेंडू स्टोक्सच्या ग्रोइन एरियावर आदळला, थेट मैदानातच बसला, VIDEO
Rishabh Pant : झुंजार रिषभ पंत! पायाला फ्रॅक्चर, तरीही मैदानात आला, २७ चेंडू खेळला, अर्धशतकही झळकावलं

मोहम्मद सिराजचा आत येणारा चेंडू टोलवताना स्टोक्स हुकला. तो थेट स्टोक्सच्या एब्डोमिनल गार्डवर जाऊन आदळला. त्यानंतरची स्टोक्सची झालेली अवस्था बघून सगळ्याच फॅन्सच्या काळजाचा ठोका चुकला. विशेष म्हणजे मोहम्मद सिराजनं फेकलेला चेंडू जेव्हा स्टोक्सच्या लागला त्यावेळी सिराजनं डीएसपी स्टाइल लूक दिला. त्यानंतर सिराज आपल्या रनअपवर निघून गेला.

स्टोक्स मैदानात गुडघ्यावरच बसला. वेदना होत असताना स्टोक्स पुन्हा सावरला आणि काही वेळातच तो पुन्हा फलंदाजीसाठी सज्ज झाला. अष्टपैलू स्टोक्सनं फलंदाजीनं सगळ्यांना प्रभावित केलंच आहे, शिवाय याआधी त्यानं गोलंदाजीतही कमाल दाखवून दिली आहे.

बेन स्टोक्सनं पहिल्या डावात पाच विकेट घेतल्या होत्या. त्याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताला ३५८ धावांवर रोखता आलं. स्टोक्सने पाचव्यांदा पाच विकेट घेण्याचा प्रताप केला आहे. स्टोक्स हा कसोटी क्रिकेटमध्ये पाच वेळा फाइव्ह विकेट हॉल आणि १० हून अधिक शतके ठोकणारा जगातील चौथा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. स्टोक्सनं घेतलेले पाच विकेट्स हे खास ठरले आहेत. कारण आठ वर्षांनी त्याने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०१७ मध्ये त्याने अशी कामगिरी केली होती.

Stokes vs Siraj :  सिराजचा चेंडू स्टोक्सच्या ग्रोइन एरियावर आदळला, थेट मैदानातच बसला, VIDEO
क्रिकेटविश्वात 'अंधार'! रिषभ पंत निमित्त, पण इंग्लंडच्या खेळाडूनं क्रिकेटच्या नियमांवरच ठेवलं बोट

जो रूटनं उडवून दिली धम्माल

बेन स्टोक्सनं गोलंदाजी आणि फलंदाजीतही शानदार कामगिरी केली. दुसरीकडे जो रूटनंही फलंदाजीत धमाल उडवून दिली. कसोटी कारकीर्दीत त्यानं ३८ वे शतक ठोकले. या मालिकेतील त्याचे दुसरे शतक ठरले आहे. रूटने भारताविरुद्ध एका संघाविरोधात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला. त्याने भारताविरुद्ध इंग्लंडमध्ये १९०० हून अधिक धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com