Rishabh Pant : झुंजार रिषभ पंत! पायाला फ्रॅक्चर, तरीही मैदानात आला, २७ चेंडू खेळला, अर्धशतकही झळकावलं

Rishabh Pant Injury : पायाला दुखापत होऊनही मैदानात आलेल्या रिषभ पंतने झुंजार खेळी केली. असह्य वेदना सहन करत त्याने इंग्लंडची भेदक गोलंदाजी भेदून काढली. तब्बल २७ चेंडू खेळला. याशिवाय त्यानं आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.
Rishabh Pant / BCCI/ X
Rishabh Pant / BCCI/ XBCCI/X
Published On
Summary
  • पाय फ्रॅक्चर असूनही रिषभ पंत मैदानात

  • इंग्लंडची भेदक गोलंदाजी भेदली

  • पायाला दुखापत असूनही २७ चेंडू खेळून काढले

  • रिषभ पंतने अर्धशतकही केलं पूर्ण

पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळं असह्य वेदना, पायावर जास्त भार न देण्याचा डॉक्टरांचा सल्ला तरीही जिगरबाज रिषभ पंत मैदानात उतरला आणि करिष्मा केला. मैदानात उतरलेल्या रिषभ पंतनं चौकारही ठोकले. प्रचंड वेदना सहन करत तो मैदानात झुंजत होता. तब्बल २७ चेंडू त्यानं खेळून काढले. इतकंच नाही तर त्याने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.

भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जखमी झालेला रिषभ पंत खेळणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. शार्दुल ठाकूर बाद झाल्यानंतर अखेर रिषभ पंत मैदानात उतरला. दुखापतीमुळं रिषभ पंत या मालिकेबाहेर जाईल अशा ज्या चर्चा सुरू झाल्या होत्या, त्यांना पूर्णविराम मिळाला.

झुंजार खेळी, झुंजार अर्धशतक

पायाला फ्रॅक्चर असल्यानं वेदना होत होत्या. त्याच्या चेहऱ्यावर त्या स्पष्टपणे दिसत होत्या. तरीही तो मैदानात खेळत होता. त्याने मैदानात उतरल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याच्या दुखऱ्या पायावर गोलंदाजी करत त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे सगळे प्रयत्न रिषभने हाणून पाडले. तो २७ चेंडू खेळला. यादरम्यान त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले. बेन स्टोक्सच्या चेंडूवर त्याने कव्हरच्या दिशेने चौकार लगावून ५० धावा पूर्ण केल्या.

जोफ्रा आर्चरने अखेर रिषभ पंतचा डाव संपुष्टात आणला. आर्चरच्या चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. त्याने एकूण ५४ धावा केल्या. ७५ चेंडूंचा सामना करताना त्याने या डावात ३ चौकार आणि २ षटकार लगावले.

Rishabh Pant / BCCI/ X
Ind vs Eng : क्रिकेटच्या इतिहासात जे घडलं नव्हतं ते मँचेस्टर कसोटीत घडलं; गंभीर-गिलच्या निर्णयानं सगळेच हैराण, नेमकं झालं तरी काय?

रिषभ पंतला नेमकं काय झालं?

इंग्लंड आणि भारत या दोन संघांमधील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशीच रिषभ पंतला दुखापत झाली. त्याच्या पायावर चेंडू लागल्याने फ्रॅक्चर झाला. तो मैदानात आल्यानंतर आक्रमक सुरूवात केली. साई सुदर्शनच्या जोडीनं त्यानं अर्धशतकी भागीदारी रचली. स्ट्राइकवर असलेला रिषभ जबरदस्त लयीत होता. आधी हाताच्या बोटाला दुखापत झाल्यानं त्रस्त होता. पण तरीही तो सुरेख फटके लगावत होता. ख्रिस वोक्सनं फेकलेला चेंडू त्याच्या पायावर आदळला. तो वेदनेने व्हिवळत होता. शेवटी त्यानं मैदान सोडलं.

रिषभच्या पायाला सूज आली होती. त्याला स्कॅनिंगसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. त्याचे रिपोर्ट आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. त्याच्या पायाला फ्रॅक्चर असल्याचे सांगण्यात आले.

Rishabh Pant / BCCI/ X
Asia Cup 2025 : आशिया कपच्या आयोजनावर शिक्कामोर्तब! या देशात होणार स्पर्धा, भारत-पाकिस्तान भिडणार का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com