
भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरमध्ये कसोटी सामना सुरू आहे. भारतासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. इंग्लंडनं या मालिकेत आघाडी घेतलीय. त्यात आता कर्णधार शुभमन गिलला देखील नशिबाची साथ काही मिळाली नाही. नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला. बेन स्टोक्सनं तातडीने भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलं. दुसरीकडं भारतानं प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत.
करुण नायरला बाहेर बसवलं आहे. संघ व्यवस्थापनाला साई सुदर्शनवर भरवसा आहे. दुसरीकडं अंशुल कंबोजला संधी दिलीय. पण मँचेस्टर कसोटीत भारतीय संघ व्यवस्थापनासह कोच गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिलनं घेतलेल्या निर्णयामुळं सगळेच बुचकळ्यात पडले आहेत. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कधीच घडलं नाही, ते चौथ्या कसोटीत घडलंय.
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत टीम इंडियानं जी प्लेइंग इलेव्हन निवडली आहे, त्यात पाच डावखुऱ्या फलंदाजांचा समावेश आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलंय. एका कसोटीत पाच डावखुरे फलंदाज खेळत आहेत. यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत, रविंद्र जडेजा, साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर हे पाच फलंदाज आहेत. सुदर्शनला करुण नायरच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलंय. करुण नायरला पहिल्या तीन कसोटी सामन्यांत संधी दिली होती. पण चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात तो अपयशी ठरला.
इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या कसोटी मालिकेतील तीन सामने झाले आहेत. चौथा सामना हा मँचेस्टरमध्ये सुरू आहे. पण कर्णधार शुभमन गिल अद्याप एकाही सामन्यात नाणेफेक जिंकला नाही. मँचेस्टरमध्येही नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या अर्थात बेन स्टोक्सच्या बाजूने लागला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघानं मागील १४ सामन्यांत एकदाही नाणेफेक जिंकली नाही. २०२५ म्हणजेच यावर्षीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत भारतीय संघानेच सर्वाधिक वेळा नाणेफेक गमावली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.