क्रिकेटविश्वात 'अंधार'! रिषभ पंत निमित्त, पण इंग्लंडच्या खेळाडूनं क्रिकेटच्या नियमांवरच ठेवलं बोट

substitute rule in cricket : भारतीय संघाचा उपकर्णधार विकेटकीपर रिषभ पंत याच्या पायाला फ्रॅक्चर झालाय. असह्य वेदना झेलत चौथ्या कसोटीत फलंदाजीला उतरून त्यानं जिगरबाज खेळी केली. जायबंदी असूनही त्याचं मैदानावर येणं हे भावुक आणि प्रेरणादायी होतं. पण याचवरून इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानं क्रिकेटच्या जुन्या नियमांवर बोट ठेवलं आहे.
Should injured players be replaced in Test cricket?
Rishabh Pant injury MICHAEL VAUGHANsaam tv
Published On
Summary
  • रिषभ पंत दुखापतग्रस्त असूनही फलंदाजीसाठी उतरला

  • इंग्लंडचा दिग्गज खेळाडू मायकल वॉननं क्रिकेटच्या नियमांवर ठेवलं बोट

  • सब्स्टीट्यूट नियमात बदल करण्याची आवश्यकता

Rishabh Pant injury substitute rule ICC debate : भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार आणि विकेटकीपर रिषभ पंत याला चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशीच दुखापत झाली. गोलंदाजानं फेकलेला चेंडू त्याच्या पायावर लागला. त्याला फ्रॅक्चर झाला. तरीही तो खचला नाही. डगमगला नाही. मैदानावर उतरून त्यानं झुंजार खेळी केली. इंग्लिश गोलंदाजांना पुरून उरला. त्याचं अर्धशतकही पूर्ण केलं. रिषभ पंतला दुखापत होऊनही मैदानात उतरावं लागलं. याचवरून इंग्लंडचा दिग्गज खेळाडू मायकल वॉन यानं क्रिकेटच्या नियमांवर बोट ठेवलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये मेडिकल सब्स्टीट्यूटची परवानगी न देणं म्हणजे क्रिकेट अजूनही जुन्या नियमांच्या चक्रव्यूहात अडकलं आहे, याचं हे द्योतक आहे, असं वॉनचं म्हणणं आहे.

रिषभ पंतला मँचेस्टर कसोटीत दुखापत झाली. त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाला. तरीही तो मैदानात उतरला. कसोटीच्या पहिल्या दिवशीच दुखापत झाल्यानंतर तो मैदान सोडून गेला. तो मैदानात पुन्हा उतरेल की नाही याबाबत साशंकता होती. पण तो दुसऱ्या दिवशी मैदानात उतरला. ३७ धावांवरून त्यानं पुढे खेळत अर्धशतकही पूर्ण केलं. दुसऱ्या दिवसाच्या खेळात त्यानं २८ चेंडूंचा सामना करताना १७ धावा केल्या.

रिषभ पंतच्या या झुंजार खेळीचं क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गजांनी कौतुक केलं. अगदी सचिन तेंडुलकरपासून अन्य महान खेळाडूंनी स्तुतिसुमनं उधळली. इंग्लंडचा दिग्गज खेळाडू मायकल वॉननंही त्याच्या खेळीचं कौतुक केलं. फ्रॅक्चर झालेल्या पायानं पंतना फलंदाजी करताना बघणं जबरदस्तच होतं. कौशल्य आणि हिंमत दाखवली. तो धावू शकत नव्हता. त्याची दुखापत आणखी वाढली असती, असं वॉन म्हणाला.

विकेटकीपरच्या जागी सब्स्टीट्यूट खेळण्यासाठी मैदानात येऊ शकतो. पण फलंदाजी आणि गोलंदाजी का करू शकत नाही. हा नियम विचित्र आणि चुकीचा आहे. क्रिकेट असा एकमेव खेळ आहे, ज्यात अशा परिस्थितीत खेळाडू बदलला जाऊ शकत नाही. क्रिकेट अजूनही अंधकारमय युगात आहे, असं वॉन म्हणाला.

सब्स्टीट्यूट नियमाबाबत काय म्हणाला वॉन? Michael Vaughan on outdated cricket regulations

वॉनच्या म्हणण्यानुसार, दुखापतग्रस्त खेळाडूच्या ऐवजी अन्य खेळाडू म्हणजेच फलंदाजाच्या जागी फलंदाज आणि फिरकीपटूच्या जागी फिरकीपटू अशा प्रकारच्या खेळाडूचा संघात समावेश करण्याची परवानगी मिळाली पाहिजे. एखाद्या खेळाडूला फ्रॅक्चर किंवा गंभीर दुखापत झाली असेल आणि स्कॅनमधून ते सिद्ध झालं तर त्याच्या जागी अन्य खेळाडूला घ्यायला हवं.

सामना सुरू होण्याआधी प्रत्येक खेळाडूसाठी बॅकअपसाठी एक खेळाडू निश्चित करायला हवा. दोन्ही संघांनी त्याला मंजुरी दिली पाहिजे. सामनाधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष ठेवावे. कन्कशन म्हणजेच डोक्याला झालेल्या दुखापतीसाठी सब्स्टीट्यूट मिळतो, पण इतर दुखापतींसाठी नाही हे समजण्यापलीकडे आहे, असंही वॉन म्हणाला.

जुन्या नियमांत अडकून राहिल्यानं होतं नुकसान Should injured players be replaced in Test cricket?

वॉन यानं क्रिकेटच्या नियमांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जुन्या नियमांमध्ये अडकून राहिल्याने जाणूनबुजून क्रिकेटचं नुकसान केलं जात आहे. यामुळं एका संघाला पुढील चार दिवस १० खेळाडूंसह खेळावं लागतं. दुसरीकडं त्यानं पंतच्या खेळण्याच्या शैलीवरही टीका केली. ख्रिस वोक्सचा चेंडू खेळताना स्वीप शॉट मारणं हा मूर्खपणा आहे. पंतला तो चेंडू पारंपरिक पद्धतीने खेळून काढायला हवा होता, असं वॉन म्हणाला.

Should injured players be replaced in Test cricket?
Rishabh Pant : झुंजार रिषभ पंत! पायाला फ्रॅक्चर, तरीही मैदानात आला, २७ चेंडू खेळला, अर्धशतकही झळकावलं

पंत इतरांपेक्षा वेगळाच!

रिषभ पंतसारखा खेळाडू कधी बघितला नाही. ते सर्वांपेक्षा वेगळाच आहे. दुखापत ही स्वतःच्या चुकीनं होऊ शकते, पण तरीही त्यानं मैदानात उतरून झुंजार वृत्तीनं खेळला, ते कौतुकास्पद आहे. ते लंगडत मैदानात आला. त्याच्या पायातील एक बूट मोठा आणि जाड होता. तरीही त्याने बेन स्टोक्ससारख्या गोलंदाजाचा सामना केला. अन्य खेळाडू बऱ्याचदा घाबरतात, असंही वॉन म्हणाला.

Should injured players be replaced in Test cricket?
Rishabh Pant: मला शंका येतेय की...! ऋषभ पंतच्या फ्रॅक्चरबाबत काय म्हणाला रिकी पॉन्टिंग?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com