virat kohli saam tv news
Sports

IND vs ENG: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! इंग्लंडविरुद्ध पहिल्या २ कसोटी सामन्यातून विराट कोहली बाहेर

Virat Kohli Ruled Out: भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. विराट कोहली इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सुरुवातीच्या २ सामन्यांच्या मालिकेतून विराट कोहली बाहेर झाला आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Ruled Out From IND vs ENG Test:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २२ जानेवारीपासून हैदराबादच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडूंनी कसून सराव करायला सुरुवात केली आहे.

दरम्यान या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. विराट कोहली मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांमधून बाहेर पडला आहे.

सुरुवातीच्या २ सामन्यांमधून विराट बाहेर...

बीसीसीआयने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, विराट कोहलीने भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यातून नाव मागे घेण्याची विनंती केली होती.

त्याने वैयक्तिक कारणास्तव या मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सन्मान करत बीसीसीआयने त्याची ही विंनती मान्य केली आहे. लवकरच च्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली जाऊ शकते. (Cricket News In Marathi)

भारत- इंग्लंड कसोटी मालिका

विराट कोहली सुरुवातीच्या २ कसोटी सामन्यांमधून बाहेर होणं हा भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. कारण तो सध्या तुफान फॉर्ममध्ये असून गेल्या काही सामन्यांमध्ये त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला आव्हान देण्यासाठी संघात विराट कोहलीसारखा अनुभवी फलंदाज असणं गरजेचं आहे. त्याचा अनुपस्थितीत रोहित शर्मा आणि जयस्वालवर संघाला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी असणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक),आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आवेश खान.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT