big blow for team india Shahbaz Nadeem announced retirement from all forms of cricket  saam tv news
Sports

IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! संघातील दिग्गज गोलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धरमशालेत रंगणार आहे. या मालिकेत भारतीय संघाने ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे

Ankush Dhavre

Shahbaz Nadeem:

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात सुरु असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धरमशालेत रंगणार आहे. या मालिकेत भारतीय संघाने ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान शेवटचा सामना जिंकून भारतीय संघ ही मालिका ४-१ ने आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघातील गोलंदाजाने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघातील फिरकी गोलंदाज शाहबाज नदीमने (Shahbaz Nadeem) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंड संघाचे प्रतिनिधित्व करणारा हा गोलंदाज राजस्थानविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. त्याने आपल्या कारकिर्दीत ५४२ गडी बाद केले आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता तो जगभरातील क्रिकेट लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसून येऊ शकतो.

नदीमने ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की,' मी बऱ्याच वर्षांपासून हा निर्णय घेण्याच्या विचारात होतो. अखेर मी तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा तुमच्यासमोर एखादी प्रोत्साहीत करणारी (भारतीय संघात स्थान) गोष्ट असते,तेव्हा तुम्ही आणखी जोर लावता. आता मला माहीत आहे की, मला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे युवा खेळाडूंना संधी देणं उत्तम असेल. मी आता टी-२० लीग स्पर्धा खेळण्याच्या विचारात आहे. ' (Cricket news in marathi)

शाहबाज नदीमच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याला भारतीय संघासाठी २ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान गोलंदाजी करताना त्याने ३४.१२ च्या सरासरीने ८ गडी बाद केले. यादरम्यान ४० धावा खर्च करत ४ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. त्याला २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाकडून पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती.

तर २०२१ मध्ये झालेला इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला आहे.प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने २८.८६ च्या सरासरीने ५४२ गडी बाद केले होते. यादरम्यान ४५ धावा खर्च करत ७ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sheikh Hasina: माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशी, बांग्लादेशमधील हिंसाचाराचा ठपका

Maharashtra Live News Update: नांदेडच्या हदगाव नगरपरिषद निवडणूकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र

Baba Vanga Gold Prediction : पुढच्या वर्षी सोनं स्वस्त होणार की महागणार? बाबा वेंगा यांची मोठी भविष्यवाणी

Pickle Storage Tips: हिवाळ्यात लोणचे खराब होऊ नये म्हणून कसे साठवावे? ही सोपी पद्धत नक्की फॉलो करा

Maharashtra Politics: शेवटच्या क्षणी अजितदादांनी उघडला पत्ता; बारामतीत नगराध्यक्षपदासाठी उतरवला तगडा उमेदवार|VIDEO

SCROLL FOR NEXT