team india twitter
क्रीडा

IND vs NZ: टीम इंडियाला मोठा धक्का! मुंबई कसोटीतून मुख्य गोलंदाज बाहेर; कारण...

India vs New Zealand 3rd Test, Jasprit Bumrah: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सांमन्यातून भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज बाहेर पडला आहे.

Ankush Dhavre

India vs New Zealand 3rd Test: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. मालिकेत २-० ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघासाठी मालिकेतील तिसरा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं आहे. दरम्यान मालिकेतील तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाने मोठा निर्णय घेतला आहे. जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या कारणामुळे दिली विश्रांती

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बॉर्डर - गावसकर ट्रॉफीसाठी वर्कलोड मॅनेज करण्यासाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने गमावलेल्या भारतीय संघावर व्हॉईटवॉशचं संकट आहे.

त्यामुळे भारतीय संघाला तिसरा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकायचा आहे. दरम्यान बुमराह संघाबाहेर होणं हा भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. केवळ मालिकेसाठीच नव्हे, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीनेही हा सामना भारतीय संघासाठी महत्वाचा असणार आहे

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी दिली विश्रांती

न्यूझीलंडविरुद्धची मालिका झाल्यानंतर भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेच्या दृष्टीने जसप्रीत बुमराह अतिशय महत्वाचा गोलंदाज असणार आहे. त्यामुळे बुमराह फिट असणं अतिशय महत्वाचं असणार आहे. हेच कारण आहे की, बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध कशी राहिली बुमराहची कामगिरी ?

न्यूझीलंडविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये बुमराहला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्याने मालिकेतील पहिल्या कसोटीतच ३ गडी बाद केले. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याला एकही गडी बाद करता आलेला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: विधानसभेसाठी मनोज जरांगेंचा फुलप्रुफ प्लॅन, मविआला बसणार फटका? वाचा स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar: निवडणूक आयोगाचा शरद पवार गटाला मोठा दिलासा; Trumpet च्या चिन्हाचं भाषांत्तर 'ट्रम्पेट' च

Prakash Ambedkar: निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रकाश आंबेडकरांची प्रकृती खालवली; रक्तात आढळली गाठ

Adulterated Sweets: ऐन सणासुदीत भेसळीचा काळाबाजार; बाजारात विकला जातोय नकली खवा?

Maharashtra News Live Updates: कल्याण पश्चिम विधानसभेतील शिवसेना शिंदे गटाचे बंडखाेर उमेदवार अरविंद मोरे यांची माघार

SCROLL FOR NEXT