Team india X/BCCI
Sports

ICC Test Ranking: टीम इंडियाला मोठा धक्का! ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर समोर आली वाईट बातमी

ICC Test Ranking News: रोहित शर्मा हा दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका ड्रॉ करणारा दुसराच भारतीय कर्णधार ठरला आहे. मात्र या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

Ankush Dhavre

ICC Test Ranking News:

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने केपटाऊनच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. यासह केपटाऊनच्या मैदानावर कसोटी सामना जिंकणारा भारतीय संघ आशियातील पहिलाच संघ ठरला आहे.

भारतीय संघाने दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका ड्रॉ केली आहे. एमएस धोनीनंतर अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा हा दुसराच भारतीय कर्णधार ठरला आहे. मात्र या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

केपटाऊन कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघाने इतिहास रचला, मात्र या सामन्यानंतर भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. आयसीसी क्रिकेट मंडळाने कसोटी रँकिंग जाहिर केली आहे. या रँकिंगमध्ये भारतीय संघाला घसरण झाली आहे. भारतीय संघ दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारत- दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय संघ रँकिंगमध्ये अव्वल स्थानी होता.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या मैदानावर खेळला गेला होता. या पराभवामुळे भारतीय संघाचं १ रेटिंगचं नुकसान झालं आहे. केपटाऊन कसोटी जिंकून भारतीय संघाने ही मालिका १-१ ने ड्रॉ केली आहे.

या मालिकेनंतर ताज्या रँकिंगमध्ये भारतीय संघाची रेटिंग ११८ वरुन ११७ वर घसरली आहे. त्यामुळे भारतीय संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. (Latest sports updates)

अव्वल स्थानी कोणता संघ?

सध्या पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ २-० ने आघाडीवर आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाला या आघाडीचा फायदा कसोटी रँकिंगमध्ये झाला आहे.

लेटेस्ट रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा संघ आघाडीवर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे रेटिंग पॉईंट्स आणखी वाढू शकतात.

आयसीसीच्या रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी असून, भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे. तर इंग्लंडचा संघ तिसऱ्या स्थानी,दक्षिण आफ्रिकेचा संघ चौथ्या स्थानी आणि न्यूझीलंडचा संघ पाचव्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT