भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामना केपटाऊनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्जी दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे.
मालिकेतील दुसरा कसोटी सामना येत्या ३ ते ७ जानेवारी दरम्यान खेळला जाणार आहे. मात्र या सामन्यासाठी कोएत्जी उपलब्ध नसणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान तो पूर्णपणे फिट नसल्याचे दिसून आले होते. (Gerald Coetzee News In Marathi)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना झाल्यानंतर कोएत्जी दुखापतग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला स्कॅनसाठी पाठवण्यात आलं आहे.त्याची रिप्लेसमेंट म्हणून लुंगी एन्गिडी खेळताना दिसून येऊ शकतो. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
पहिल्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २४५ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात भारतीय संघाला केवळ १३१ धावा करता आल्या. या धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने ४०८ धावा केल्या होत्या. हा सामना भारतीय संघाला १ डाव आणि ३२ धावांनी गमवावा लागला आहे. (Latest sports updates)
या सामन्यात कोएत्जीने गोलंदाजी करताना १६ षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने ७४ धावा खर्च करत १ गडी बाद केला. तर दुसऱ्या डावात त्याला ५ षटक गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने २८ धावा खर्च केल्या. कोएत्जी दुखापतग्रस्त झाल्याने नक्कीच दक्षिण आफ्रिकेच्या चिंतेत भर पडली असेल. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी खेळताना दिसून येऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.