भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट्स पार्कच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ३२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.
यासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला कुठल्याही परिस्थितीत दुसऱ्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघात घातक गोलंदाजाला स्थान देण्यात आलं आहे.
भारतीय संघात घातक गोलंदाजाची एन्ट्री..
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा दुसरा कसोटी सामना ३ ते ७ जानेवारीदरम्यान खेळला जाणार आहे. भारतीय संघाला ही मालिका ड्रॉ करायची असेल तर दुसरा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.
दरम्यान गोलंदाजीक्रम आणखी मजबूत करण्यासाठी वेगवान गोलंदाज आवेश खानचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
दुसऱ्या कसोटीत गोलंदाजीक्रम बदलणार?
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघातील गोलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना आपली छाप सोडता आली नाही. तर प्रसिद्ध कृष्णा महागडा गोलंदाज ठरला. आता हीच चूक सुधरवण्यासाठी आवेश खानचा संघात समावेश करण्यात आला आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वीच मोहम्मद शमी दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला होता. त्याची रिप्लेसमेंट म्हणून आवेश खानची निवड करण्यात आली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते. (Latest sports updates)
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ:
: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा, के.एस. भरत (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.