IND-W vs AUS-W: पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया उतरणार मैदानात;दुसरा वनडे सामना इथे पाहा फुकटात

India- W vs Australia- W 2nd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती.
ind w vs aus w
ind w vs aus wX/BCCI Womens
Published On

When And Where To Watch India- W vs Australia- W 2nd ODI:

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. तर दुसरा सामना आज खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ वनडे मालिका १-१ च्या बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

पहिल्या वनडेत भारतीय संघाचा पराभव..

भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २८२ धावा केल्या होत्या.

ही भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली सर्वात मोठी धावसंख्या होती. भारतीय संघाकडून जेमिमा रॉड्रिग्जने सर्वाधिक ८२ धावांची खेळी केली. तर पूजा वस्त्राकरने नाबाद ६२ धावा केल्या. हे मोठं आव्हान ऑस्ट्रेलियाने २१ चेंडू शिल्लक ठेऊन पूर्ण केलं.

ind w vs aus w
IND vs SA Test Series: टीम इंडियासाठी गुड न्यूज! दक्षिण आफ्रिकेला नडणारा भारतीय खेळाडू दुसऱ्या कसोटीत करतोय कमबॅक

केव्हा खेळला जाईल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना ३० डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना किती वाजता सुरू होईल?

हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना कुठे खेळला जाईल?

हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

भारत - ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना लाईव्ह कुठे पाहता येईल?

हा सामना तुम्ही स्पोर्ट्स १८ वर लाईव्ह पाहू शकता. (Cricket News In Marathi)

ind w vs aus w
IND vs SA: क्रिकेट इतिहासात जे कोणालाच नाही जमलं ते विराटने करुन दाखवलं! सचिन, संगकाराला मागे सोडत बनला नंबर १

पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात दमदार कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. याबाबत बोलताना फिल्डींग कोच म्हणाले की, भारतीय संघाला फलंदाजीसह गोलंदाजी आणि फिल्डींगवर भर देण्याची गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com