rajasthan royals twitter
Sports

Rajashatan Royals: IPL 2025 स्पर्धेआधी राजस्थानचं टेन्शन वाढलं! संघातील प्रमुख सदस्य दुखापतग्रस्त

Rajasthan Royals, Rahul Dravid Injury: आयपीएल २०२५ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान ही स्पर्धा सुरु होण्याआधी राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे.

Ankush Dhavre

Rahul Dravid Injury: आयपीएल २०२५ स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. या स्पर्धेला येत्या २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू एकवटले आहेत. दरम्यान स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. राहुल द्रविड १२ मार्चला संघासोबत जोडला जाणार असल्याचं म्हटलं जात होतं. ही दुखापत क्रिकेट खेळत असताना झाली असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र स्पर्धा सुरु होण्याआधीच राहुल द्रविड दुखापतग्रस्त होणं, ही राजस्थान रॉयल्स संघासाठी टेन्शन वाढवणारी बातमी आहे.

राजस्थान रॉयल्सने पोस्ट शेअर करत दिली माहिती

राजस्थान रॉयल्सने पोस्ट शेअर करत माहिती देत म्हटले की, 'मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला बंगळुरुत क्रिकेट खेळताना डाव्या पायाला दुखापत झाली होती. तो रिकव्हर होत असून जयपूरमध्ये संघासोबत जोडला जाईल.' राजस्थानच्या इंस्टाग्राम अंकाऊटवरुन शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, राहुल द्रविडच्या पायाला प्लास्टर लावल्याचं दिसून येत आहे.

गेल्या वर्षी स्वीकारली होती जबाबदारी

राहुल द्रविडने गेली काही वर्ष भारतीय संघाला प्रशिक्षण दिलं. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती. त्यानंतर त्याचा कॉन्ट्रॅक्ट संपला. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रविडला राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर मिळाली.

राहुल द्रविड आगामी हंगामात कर्णधार संजू सॅमसन, संघाचा डायरेक्टर कुमार संगकारासोबत मिळून काम करताना दिसून येणार आहे. राजस्थान रॉयल्स संघासोबत मिळून काम करण्याची ही द्रविडची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील त्याने या संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये काम केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT