india and pakistan  saam tv news
Sports

Champions Trophy 2025: पाकिस्तानला ICC चा दणका! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत घेतला मोठा निर्णय

ICC Decision On Champions Trophy: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. दरम्यान या स्पर्धेबाबत आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा थरार पाकिस्तानात रंगणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. या स्पर्धेला १९ फेब्रुवारीला सुरुवात होऊ शकते असं माध्यमातील वृत्तांमध्ये म्हटलं जात आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाहीये. याबाबत अधिकृत घोषणा केली गेली नसली तरीदेखील माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा केला जात आहे. दरम्यान आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डला धक्का देत प्लान बी तयार केला आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कोलंबोत आयसीसीची बैठक पार पडली. या बैठकीत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ६५ मिलियन डॉलरच्या बजेटला मंजुरी देण्यात आली आहे. भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यासाठी जाणार नाहीये अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे भारताचे सामने पाकिस्तानच्या बाहेर खेळवले जावे यासाठीही या बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डला अजूनही वाटतंय की, भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यासाठी येणार. मात्र असं होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डला ४४० व्होल्टचा धक्का दिला आहे. पाकिस्तानने संभावित वेळापत्रक जाहीर केलं होतं. ज्यात भारतीय संघाने सामने लाहोरमध्ये होणार असल्याचं म्हटलं गेलं होतं. भारतीय संघाचा ज्यात गटात समावेश करण्यात आला आहे. त्यात गटात भारतीय संघासह, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेशचा समावेश करण्यात आला आहे.

यापूर्वी आशिया कप २०२३ स्पर्धेचे यजमानपदही पाकिस्तानकडे होते. त्यावेळीही पाकिस्तानला असं वाटलं होतं की, भारतीय संघ पाकिस्तानात येणार. मात्र बीसीसीआयने स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे ही स्पर्धा हाय ब्रिड मॉडेलमध्ये खेळवावी लागली होती. त्यावेळी भारतीय संघाचे सामने श्रीलंकेत खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या स्पर्धेतील फायनलचा सामनाही श्रीलंकेत खेळवण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mehndi Design : स्टायलिश अन् हटके मेहंदी डिझाइन; दिवाळीला हात दिसतील सुंदर, पाहा PHOTOS

दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना! खासदारांच्या निवासस्थानाला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी; VIDEO

Maharashtra Live News Update : गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे धनगर समाज बांधवाची आत्महत्या

Mumbai-Pune Electric Highway : मुंबई-पुण्याचा प्रवास आता आणखी स्वस्तात, इलेक्ट्रिक हायवेमुळे होणार फायदाच फायदा, वाचा सविस्तर

SIM Card Rules: सतर्क राहा! जास्त सिमकार्ड ठेवाल तर सरकारची कारवाई, नियम मोडल्यास २ लाख रुपयांचा दंड

SCROLL FOR NEXT