lsg vs dc playing XI prediction lucknow super giants vs delhi capitals playing 11 news in marathi amd2000 twitter
Sports

LSG vs DC: दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी लखनऊला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त

Justin Langer On Mayank Yadav Injury: आयपीएल २०२५ स्पर्धेतील तिसरा सामना आज लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यापूर्वी लखनऊचं टेन्शन वाढलं आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते.

दरम्यान या सामन्यापूर्वीच लखनऊ सुपर जांयट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाचे हेड कोच जस्टीन लँगर यांनी मयांक यादव पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाल्याची माहिती दिली आहे. मयांकच्या बोटाला दुखापत झाला आहे. त्यामुळे त्याचं आयपीएल २०२५ स्पर्धेतील कमबॅक आणखी लांबणीवर गेलं आहे.

काय म्हणाले जस्टीन लँगर ?

जस्टीन लँगर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, 'गेल्या हंगामात मयांकने आपल्या शानदार गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आम्ही त्याच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहतोय. मात्र त्याच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या बोटाला इन्फेक्शन झालं आहे. त्यामुळे त्याला रिहॅबसाठी १ ते २ आठवड्यांचा अवधी लागणार आहे. आनंदाची बातमी म्हणजे, तो फिट आहे आणि रनिंग करतोय. मी कालच त्याचा व्हिडिओ पाहिला, तो स्पर्धेतील शेवटच्या सामन्यांपर्यंत फिट होऊ शकतो.' मयांक यादव गेल्या काही महिन्यांपासून मैदानापासून दूर आहे. मात्र कोच जस्टीन लँगरला विश्वास आहे की, तो लवकरच मैदानावर कमबॅक करु शकतो.

लखनऊसमोर दिल्लीचं आव्हान

लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून रिषभ पंत पहिल्यांदाच संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर गेल्या हंगामात लखनऊचं नेतृत्व करणारा केएल राहुल यावेळी दिल्लीकडून खेळताना दिसून येणार आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते लखनऊची प्लेइंग ११:

जॅक फ्रेजर-मॅकगर्क, केएल राहुल, फाफ डु प्लेसिस, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, मिशेल स्टार्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, मोहित शर्मा आणि टी नटराजन.

इम्पॅक्ट प्लेयर- आशुतोष शर्मा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded Flood: नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला|VIDEO

Potato Bhaji Recipe : बटाट्याच्या भाजीला द्या साऊथ इंडियन तडका, एक घास खाताच पाहुणे करतील कौतुक

Crime : गर्लफ्रेंडचा अंघोळ करताना व्हिडीओ बनवला, रागाच्या भरात बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्टच कापला

Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मुस्लिम आणि बौद्ध समाजाचा पाठिंबा; आरक्षणासाठी ताफा मुंबईकडे|VIDEO

Maharashtra Live News Update: पुणे मेट्रोची वाहतूक आता रात्री २ वाजेपर्यंत

SCROLL FOR NEXT