big blow for australia before ind vs aus match marcus stoinis may missed first match of world cup due to injury world cup 2023 saam tv
Sports

IND vs AUS: टीम इंडियाविरूद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! संघातील हुकमी एक्का बाहेर?

Marcus Stoinis: भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Ankush Dhavre

IND vs AUS, World Cup 2023:

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील हाय व्होल्टेज सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. हा सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. संघातील अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोइनिसच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलियाचा पहिलाच सामना असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयी सलामी देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मात्र मार्कस स्टोइनिस बाहेर झाल्यास ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भर पडू शकते.

कारण तो गोलंदाजीत आणि फलंदाजीत संघासाठी मोलाचं योगदान देऊ शकतो. भारतीय संघाविरूद्ध झालेल्या वनडे मालिकेदरम्यान मार्कस स्टोइनिसला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवला होता.

काय म्हणाला कर्णधार?

भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या सामन्याच्या एक दिवसापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने पत्रकार परिषदेत सहभाग घेतला होता. यादरम्यान तो म्हणाला की,'आम्ही प्लेइंग ११ ची घोषणा उद्या करू.तो संघात आहे, आज तो कशी कामगिरी करू त्यावरून त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान द्यायचं की नाही ते ठरवू'

भारतीय संघाला मोठा धक्का!

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला देखील मोठा धक्का बसला आहे. संघातील सलामीवीर फलंदाज शुबमन गिलला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या त्याचं खेळणं कठीण दिसून येत आहे. मात्र याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. (Latest sports updates)

आगामी वनडे वर्ल्डकपसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ:

पॅट कमिंस (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सिन एबॉट, अॅश्टन एगर, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा आणि मिचेल स्टार्क.

असा आहे भारताचा संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी,आर अश्विन, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT