World Cup 2023: वर्ल्डकपचा पहिलाच पेपर कठीण! कांगारूंविरूद्ध चिंता वाढवणारा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड

Team India Record Against Australia In World Cup: कसा राहिलाय भारतीय संघाचा रेकॉर्ड? जाणून घ्या.
india vs australia record at ma chidambaram stadium chepauk chennai ind vs aus world cup head to head record
india vs australia record at ma chidambaram stadium chepauk chennai ind vs aus world cup head to head recordSaam tv news
Published On

India vs Australia, World Cup 2023:

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघाविरूद्ध रंगणार आहे. हा सामना येत्या रविवारी चेन्नईतील एमए चिंदबरम स्टेडियमवर रंगणार आहे. इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्याने या स्पर्धेची सुरूवात झाली होती.

आता भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने येणार आहेत. दरम्यान या सामन्यापू्र्वी जाणून घ्या कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड.

चेन्नईत खेळताना ऑस्ट्रेलियाचा दमदार रेकॉर्ड..

चेन्नईत होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळू शकतो. दोन वेळचा चॅम्पियन भारतीय संघाला ५ वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा संघ कडवी झुंज देताना दिसून येऊ शकतो.

कारण चेन्नईत खेळताना ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. या मैदानावर ऑस्ट्रेलियाने ६ वनडे सामने खेळले आहेत. यापैकी ५ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. तर केवळ एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

india vs australia record at ma chidambaram stadium chepauk chennai ind vs aus world cup head to head record
Asian Games 2023: भारतीय नारींचा एशियन गेम्समध्ये डंका! कबड्डीत सुवर्णपदकावर कोरलं नाव

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ २०१७ मध्ये आमने सामने आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती.

तर चेन्नईच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघाचा रेकॉर्ड पाहिला तर, ३ सामन्यांपैकी २ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. तर १ सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. (Latest sports updates)

india vs australia record at ma chidambaram stadium chepauk chennai ind vs aus world cup head to head record
World Cup 2023 Prediction: ओपनिंग सामन्यात रचिन अन् डेवोनच्या शतकांनंतर घडला अजब योगायोग! यंदा कोणता संघ मारणार बाजी?

वर्ल्डकपमध्ये कोण-कोणावर भारी?

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचा वर्ल्डकपमधील रेकॉर्ड पाहिला तर हे दोन्ही संघ १२ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान केवळ ४ सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे.

तर उर्वरीत सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. या आकडेवारीतही ऑस्ट्रेलियाचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे.

भारत- ऑस्ट्रेलियाचा वनडे रेकॉर्ड (चेन्नईत)

९ ऑक्टोबर १९८७ - ऑस्ट्रेलियाचा १ धावाने विजय

१७ सप्टेंबर २०१७- भारतीय संघाचा २६ धावांनी विजय

२२ मार्च २०२३- ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी विजय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com