आयसीसी वर्ल्डकप २०२३ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगला. या सामन्यात २८३ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने एकहाती विजय मिळवला आहे.
या विजयात डेवोन कॉनवे आणि रचिन रविंद्रचा मोलाचा वाटा राहिला आहे. दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करत शतकं झळकावली. या शतकी खेळीसह न्यूझीलंड संघासाठी सुख:द योगायोग जुळून आला आहे.
न्यूझीलंडने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेला दमदार सुरूवात केली आहे. पहिल्याच सामन्यात डेवोन कॉनवेने १२१ चेंडूंचा सामना करत १५२ धावांची खेळी केली. तर रचिन रविंद्रने ९६ चेंडूंचा सामना करत १२३ धावांची खेळी केली.
यासह शतकांसह न्यूझीलंड संघाच्या वर्ल्डकप जिंकण्याच्या आशा जिवंत झाल्या आहेत.आम्ही असं का म्हणतोय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. तर हा योगायोग एकदा पाहाच.
वर्ल्डकप स्पर्धेत पहिलं शतक झळकावणाऱ्या संघाने जिंकलाय वर्ल्डकप..
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंग याने वर्ल्डकप २००७ स्पर्धेत पहिलं शतक झळकावलं होतं. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने जेतेपदाला गवसणी घातली होती.
भारतीय संघाने २०११ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली होती. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वीरेंद्र सेहवागने १७५ धावांची खेळी केली होती.
तर विराट कोहलीने नाबाद १०० धावा ठोकल्या होत्या. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रीलंकेला धुळ चारत भारतीय संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती.
तर २०१५ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन ऑस्ट्रेलियात करण्यात आले होते. या स्पर्धेत यजमान ऑस्ट्रेलियाने जेतेपदाला गवसणी घातली होती. या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना आरोन फिंचने शतक झळकावलं होतं.या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने जेतेपदावर नाव कोरलं होतं. (Latest sports updates)
इंग्लंड आणि न्यझीलंड या दोन्ही संघांमध्ये झालेला वर्ल्डकप २०१९ स्पर्धेतील अंतिम सामना कुठलाही क्रिकेट चाहता विसरू शकणार नाही. अंतिम सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर देखील बरोबरीत सुटली होती.
शेवटी बाऊंड्री काऊंटच्या नियमाने इंग्लंडने जेतेपदावर नाव कोरलं होतं. या स्पर्धेतही वर्ल्ड चॅम्पियन संघातील जो रूटने पहिलं शतक झळकावलं होतं. आता रचिन रविंद्र आणि डेवोन कॉनवेच्या शतकाने पून्हा एकदा योगायोग जुळून आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.