फिरकीपटू साई किशोर आणि वॉशिंग्टन सुंदरचा भेदक मारा आणि तिलक वर्माच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील सेमीफायनल सामन्यात बांग्लादेशचा ९ विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह टीम इंडियाने सिव्हर मेडल पक्क केलं आहे. आता गोल्ड मेडलसाठी टीम इंडियाला फायनल सामना जिंकावा लागणार आहे. (Latest Marathi News)
मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या बांग्लादेशला ९६ धावांवरच रोखले. भारताने सुरुवातीपासूनच एकापाठोपाठ एक धक्के दिले.
भारतीय गोलंदाजांनी खेळपट्टीने दिलेल्या मदतीचा पुरेपूर फायदा घेतला. फिरकीपटू साई किशोर आणि वॉशिंग्टन सुंदरच्या भेदक माऱ्यासमोर बांग्लादेशच्या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. साई किशोरने ३ तर सुंदरने २ विकेट्स घेतल्या.
याशिवाय टिळक वर्मा, शहाबाज अहमद आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी पाठवलं. अर्शदीप सिंगही १ बळी घेण्यात यशस्वी ठरला. ९७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली.
नेपाळविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या यशस्वी जयस्वालला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्माने सामन्याची सूत्रे हाती घेतली. दोघांनी मिळून बांग्लादेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
दोघांनी मिळून भारताला विजयी लक्ष्य पार करून दिले. तिलक वर्माने २६ चेंडूत ५५ धावा कुटल्या. यामध्ये दोन चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. तर ऋतुराज गायकवाडने २६ चेंडूत ४० धावा ठोकल्या. त्याने ४ चौकार आणि २ षटकार लगावले.
दरम्यान, या विजयासह भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपलं सिव्हर मेडल पक्कं केलं आहे. आता सुवर्णपदाकासाठी टीम इंडियाला अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान याच्यातील विजयी संघासोबत फायनल सामना खेळावा लागणार आहे. त्यामुळे फायनलमध्ये काय होणार? याकडे क्रिडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.