Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी रचला इतिहास! १३ वर्षांनंतर रिकर्व्हमध्ये मिळालं पहिलंच पदक
Asian Games 2023:
भारतीय तिरंदाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. शुक्रवारी भारतीय महिला तिरंदाजांनी रिकर्व्ह कॅटेगरीत कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. गेल्या १३ वर्षात आशियाई क्रीडा स्पर्धेतील रिकर्व कॅटेगरीतील हे भारतासाठी पहिलंच पदक ठरलं आहे.
भारतीय महिला संघात अंकिता भकत,भजन कौर आणि सिमरनजित कौरने दमदार कामगिरी केली आहे. कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने वियतनामवर विजय मिळवला आहे.
भारतीय संघाने वियतमान संघातील अन्ह न्गुयेट, न्गुयेन थी थान्ह न्ही, होआंग फुओंग थाओ यांना ६-२ ने पराभूत केलं आहे. या पदकासह भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला आहे. कारण आशियाई क्रीडा २०१० स्पर्धेनंतर भारतीय संघाला रिकर्व कॅटेगरीत पदक जिंकता आलं नव्हतं.
आता १३ वर्षांची प्रतिक्षा संपवत या कॅटेगरीत भारताला पदक मिळालं आहे. २०१० मध्ये झालेल्या स्पर्धेत भारतीय महिला संघाने कांस्यपदकाला गवसणी घातली होती. (Latest sports updates)
आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेत तिरंदाजांचा बोलबाला..
आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेत भारतीय तिरंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत तिरदांजीत भारताला ३ सुवर्णपदकं मिळाली आहेत. भारताने ही पदकं, कंपाऊंड मिश्र महिला आणि पुरूषांच्या कॅटेगरीत पटकावली आहेत. हे आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेत भारताचे ८७ वे पदक ठरले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.