ENG vs NZ: भारतीय वंशाच्या फलंदाजाने इंग्लंडची वाजवली बँड! न्यूझीलंडला विजय मिळवून देणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण?

Who Is Rachin Ravindra: न्यूझीलंडला विजय मिळवून देणारा रचिन रविंद्र कोण आहे.
who is rachin ravindra who won match for new zealand single handedly over england in world cup opener
who is rachin ravindra who won match for new zealand single handedly over england in world cup opener twitter
Published On

Who Is Rachin Ravindra:

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०१९ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा हातचा विजय निसटला होता. या सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपा काढत न्यूझीलंडने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे.

इंग्लंडच्या गोलंदाजांना धू धू धुवत न्यूझीलंडने ९ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात न्यूझीलंडकडून खेळणारा भारतीय वंशाचा रचिन रविंद्र चमकला.

इंग्लंडने दिलेल्या २८३ धावांचा पाठलाग करताना डेवोन कॉनवेने नाबाद १५२ तर रचिन रविंद्रने नाबाद १२३ धावा केल्या. अनेकांनी रचिन रविंद्र हे नाव पहिल्यांदाच ऐकलं असेल. मात्र तुम्हाला माहितेय का? इंग्लंडची बँड वाजवणारा हा फलंदाज मूळचा भारतीय आहे.

दिग्गज भारतीयांच्या नावावरून ठेवलं नाव...

रचिन रविंद्र या नावात तुम्हाला काहीतरी वेगळेपण जाणवेल. रचिनचे वडील सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचे मोठे फॅन आहेत.

या दोघांचं नाव एकत्र करून त्यांनी रचिन हे नाव ठेवलं आहे. आपल्या वडिलांप्रमाणेच रचिन देखील सचिन तेंडुलकरचा मोठा फॅन आहे. (Who is Rachin Ravindra)

who is rachin ravindra who won match for new zealand single handedly over england in world cup opener
ENG vs NZ: रूटने न्यूझीलंडची गोलंदाजी फोडून काढली! विजयाचा नारळ फोडण्यासाठी २८३ धावांचं आव्हान

डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज आणि फिरकी गोलंदाज रचिन रविंद्रचा जन्म १८ नोव्हेंबर १९९९ रोजी वेलिंग्टनमध्ये झाला. दोन वर्षांपूर्वी त्याने भारतीय संघाविरुद्ध भारतात खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याचे वडील रवी कृष्णमूर्ती हे सॉफ्टवेअर आर्किटेक्ट आहेत. त्याच्या वडिलांना ही क्रिकेटची प्रचंड आवड होती. न्यूझीलंडला जाण्यापूर्वी ते बंगळुरूत क्लब लेव्हल क्रिकेट खेळायचे. (Latest sports updates)

who is rachin ravindra who won match for new zealand single handedly over england in world cup opener
Joe Root Six: एकच मारला,कडक मारला! बोल्टच्या वेगवान चेंडूवर रूटचा कीपरच्या डोक्यावरून षटकार, VIDEO

न्यूझीलंड संघासाठी केलाय मोठा रेकॉर्ड..

या सामन्यात त्याने ९६ चेंडूंचा सामना करत नाबाद १२३ धावा केल्या. यादरम्यान त्याने ११ चौकार आणि ५ षटकार मारले. या खेळीसह तो सर्वात कमी वयात न्यूझीलंडसाठी खेळताना वर्ल्डकप स्पर्धेत शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com