Joe Root Six: एकच मारला,कडक मारला! बोल्टच्या वेगवान चेंडूवर रूटचा कीपरच्या डोक्यावरून षटकार, VIDEO

England vs New Zealand, World Cup 2023: जो रूटने या सामन्यात अप्रतिम षटकार मारला आहे.
joe root six
joe root sixtwitter
Published On

Joe Root Six Video:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने आले आहेत. या सामन्यात न्यूझीलंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान इंग्लंड संघाकडून फलंदाजी करताना जो रूटने एक भन्नाट शॉट मारला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

joe root six
World Cup 2023 Timetable: येत्या ४६ दिवस ॲक्शन पॅक क्रिकेट! ४८ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक; पाहा इथे

जो रुटचा क्लासिक षटकार...

या सामन्यात नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या इंग्लंडला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. संघातील सलामीवीर फलंदाज लवकर बाद होत होते. त्यावेळी जो रूटने आपल्या अनुभवाचा वापर करत एक बाजू धरून ठेवली होती.

जॉनी बेअरस्टोने ३३, तर डेव्हिड मलान अवघ्या १४ धावा करत माघारी परतला. इंग्लंडचा संघ अडचणीत असताना जो रूटने ७७ धावांची खेळी केली. (Latest sports updates)

joe root six
Asian Games 2023 Hockey: हॉकीत गोल्डचं स्वप्न हुकलं! महिला संघाचा चीनकडून ४-० ने पराभव

तर झाले असे की, इंग्लंड संघाची फलंदाजी सुरू असताना न्यूझीलंड संघाकडून ११ वे षटक टाकण्यासाठी ट्रेंट बोल्ट गोलंदाजीला आला होता. या षटकात जो रूटने रिव्हर्स स्कूप शॉट खेळत किपरच्या वरून षटकार मारला.

बोल्टचा वाऱ्याचा वेगाने येणारा चेंडू जो रूटने किपरच्या वरून धुडकावून लावला. हा शॉट पाहुन गोलंदाजासह विकेटकिपर देखील आश्चर्यचकीत झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

इंग्लंडने केल्या २८२ धावा..

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. जॉनी बेअरस्टो ३३ तर डेविड मलान अवघ्या १४ धावा करत माघारी परतला. जोस बटलरने ४३ धावांचं योगदान दिलं. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या जो रुटने सर्वाधिक ७७ धावांची खेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com