bhuvneshwar kumar  saam tv
Sports

Bhuvneshwar Kumar News: स्विंगचा किंग भुवनेश्वर कुमार टीम इंडियाला ठोकणार रामराम? एका गोष्टीमुळं चर्चेला उधाण

Bhuvneshwar Kumar Instagram Bio: संघाबाहेर असताना आता त्याने सोशल मीडियावरून निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

Ankush Dhavre

Bhuvneshwar Kumar Retirement: भारतीय संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी करून त्याने भारतीय संघात कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा हा प्रयत्न अपयशी ठरला.

भारतीय संघ सध्या वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघात युवा खेळाडूंना संघात स्थान दिले गेले आहे. दरम्यान संघाबाहेर असताना आता त्याने सोशल मीडियावरून निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

एखाद्या खेळाडूला निवृत्ती जाहीर करायची असल्यास तो सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून निवृत्ती जाहीर करत असतो. त्यामुळे क्रिकेट चाहते देखील खेळाडूंच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लक्ष ठेवून असतात.

नुकताच भारतीय संघातील वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आपल्या इंस्टाग्राम बायोमुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याच्या इंस्टाग्राम बायोवर एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात त्याच्या बायोमधून भारतीय क्रिकेटर नव्हे तर केवळ भारतीय असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

आता असं म्हटलं जात आहे की, संघाबाहेर असलेला भुवनेश्वर कुमार लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करू शकतो. भुवनेश्वर कुमार भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरतोय. त्यामुळे अनेकांना असं वाटतंय की, आता भुवनेश्वर कुमार भारतीय संघासाठी कधीच खेळताना दिसून येणार नाही. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असला तरीदेखील याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. (Latest sports updates)

भुवनेश्वर कुमार २०२२ मध्ये आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. हा टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलचा सामना होता. या सामन्यानंतर तो भारतीय संघासाठी खेळताना दिसून आला नाही. आयपीएल २०२३ स्पर्धेत त्याने दमदार कामगिरी केली होती. मात्र तरीदेखील त्याला भारतीय संघात स्थान दिलं गेलं नाही. त्याने १२१ वनडे सामन्यांमध्ये १४१, ८७ टी-२० सामन्यांमध्ये ९० आणि २१ कसोटी सामन्यांमध्ये ६३ गडी बाद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

SCROLL FOR NEXT