Virat Kohli twitter
Sports

Virat Kohli Viral Video: 'आग लावून टाक..', लंडनहून परतताच फॅनची मागणी, विराटने दिलेली रिअॅक्शन व्हायरल - VIDEO

Virat Kohli News In Marathi: विराट कोहली लंडनहून भारतात परतला आहे. दरम्यान त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

Virat Kohli Viral Video: भारतीय संघाने काही दिवसांपूर्वीच बांगलादेशला २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभूत केलंय. येत्या १६ ऑक्टोबरपासून भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे.

बांगलादेशविरुद्धची मालिका झाल्यानंतर विराट लंडनला परतला होता. दरम्यान न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी तो पुन्हा एकदा मायदेशी परतला आहे. दरम्यान भारतात येताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

विराट भारतात परतला

भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. मात्र स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय संघाला न्यूझीलंडला कुठल्याही परिस्थितीत पराभूत करावं लागणार आहे.

त्यामुळे ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत विराट खेळताना दिसून आला होता. त्यानंतर तो लंडनला परतला होता. आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी मायदेशात येताच, तो एका फॅनसोबत संवाद साधताना दिसून आला आहे.

आग लावून टाक..

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विराट कोहली एअरपोर्टच्या पार्किंगमध्ये असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान कारमध्ये बसत असताना,तो एका फॅनसोबत संवाद साधताना दिसून येतोय. या व्हिडिओमध्ये फॅन त्याला म्हणतो, बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये आग लावून टाक..' हे ऐकताच विराट मागे वळून पाहतो आणि म्हणतो, 'काय? कोणाला आग लावायचीये..' विराटने दिलेली रिअॅक्शन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

विराट कोहलीने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली होती. मात्र त्यानंतर त्याला एकही मोठी खेळी करता आलेली नाही. टी-२० वर्ल्डकपनंतर तो श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये त्याला २४,१४ आणि २० धावा करता आल्या होत्या. तर बांगलादेशविरुद्धच्या २ सामन्यात त्याने २४,१४,४७,२९ धावा केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Festival Makeup Look: सणासुदीला खास लूक हवा असेल तर यावेळी 'हा' मेकअप लूक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना रोडवर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट

Dussehra 2025: दसऱ्याला आवर्जून करा ही ३ कामे, पैशांची तंगी होईल कायमची दूर

Scheduled Caste : अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केलं नाही, तर...; फडणवीस सरकारला कुणी दिला मोठा इशारा?

SCROLL FOR NEXT