IND vs BAN: तन्जीम साकिबच्या जादूई बॉलवर Abhishek Sharmaची बत्ती गुल; स्टम्प उडून पडला लांब- VIDEO

Abhishek Sharma Clean Bowled: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या सामन्यात अभिषेक शर्मा क्लिन बोल्ड झाला आहे. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होतो.
IND vs BAN: तन्जीम साकिबच्या जादूई बॉलवर Abhishek Sharmaची बत्ती गुल; स्टम्प उडून पडला लांब- VIDEO
abhishek sharmatwitter
Published On

India vs Bangladesh 2nd T20I, Abhishek Sharma: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशला धूळ चारल्यानंतर दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमत्रंण दिलंय. दरम्यान सुरुवातीलाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शांतोने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची जोडी मैदानात आली.

दोघेही आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात. दोघांनी फलंदाजीला येताच बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. मात्र दुसऱ्याच षटकात भारतीय संघाला मोठा धक्का बसला. संजू सॅमसन १० धावा करत तंबूत परतला.

IND vs BAN: तन्जीम साकिबच्या जादूई बॉलवर Abhishek Sharmaची बत्ती गुल; स्टम्प उडून पडला लांब- VIDEO
IND vs BAN: केव्हा, कुठे अन् कधी पाहता येणार दुसरा सामना? पाहा एकाच क्लिकवर

अभिषेक शर्मा क्लिन बोल्ड

संजू सॅमसन बाद झाल्यानंतरही अभिषेक शर्माने हल्लाबोल सुरुच ठेवला. मात्र तिसऱ्या षटकात त्याला देखील माघारी परतावं लागलं आहे. तर झाले असे की, बांगलादेशकडून गोलंदाजी करण्यासाठी तन्जीम साकिब गोलंदाजीला आला. त्याने षटकातील शेवटचा चेंडू गुड लेंथवर टाकला. या चेंडूवर अभिषेकने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटच्या कडाला लागून स्टम्प उडवून गेला. चेंडू स्टम्पला लागताच, स्टम्प दूर जाऊन पडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

IND vs BAN: तन्जीम साकिबच्या जादूई बॉलवर Abhishek Sharmaची बत्ती गुल; स्टम्प उडून पडला लांब- VIDEO
IND vs BAN: मोठी बातमी! दुसऱ्या सामन्याआधी स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत - संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, नितीश कुमार रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकु सिंग, अर्शदीप सिंग, मयंक यादव, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती.

बांगलादेश - परवेझ हुसैन इमॉन, लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हृदोय, महमुदुल्ला,रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान, जाकेर अली, मेहिदी हसन मिराझ.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com