Virat Kohli-KL Rahul Asia Cup 2023/BCCI-X SAAM TV
Sports

KL Rahul: केएल राहुलला लॉटरी लागली! Champions Trophy आधी BCCI ने दिली मोठी ऑफर

KL Rahul News In Marathi: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी संघाची घोषणा करण्याआधी एक मोठी अपडेट समोर येत आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघ येत्या काही दिवसात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एकाच दिवशी संघाची घोषणा होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ५ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. या मालिकेतून केएल राहुलला विश्रांती दिली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. तर रिषभ पंतला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधी दिली जाणार असल्याचं म्हटलं जातआहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलला इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मर्यादीत षटकांच्या मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. ज्यात ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेचा समावेश असणार आहे. मात्र केएल राहुलसाठी आनंदाची बातमी म्हणजे, त्याला निवडकर्त्यांनी आश्वासन दिलं आहे की, त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान दिलं जाईल.

एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, राहुलने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात स्थान निश्चित केलं आहे. पण इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

केएल राहुलला टी-२० संघात आपलं स्थान टिकवून ठेवता आलेलं नाही. मात्र वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत त्याने यष्टीरक्षक फलंदाजाची भूमिका बजावली होती. या स्पर्धेत तो मध्यक्रमात खेळताना दिसून आला होता. मध्यक्रमात खेळताना त्याने धावांचा पाऊस पाडला आहे.

बॉर्डर- गावसकर मालिकेत शानदार फलंदाजी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत रोहित शर्माला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुल सलामीला फलंदाजीसाठी आला होता. या संधीचा त्याने चांगलाच फायदा घेतला होता. सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये त्याने शानदार सुरुवात करुन दिली होती. मात्र भारतीय संघाला ही मालिका १-३ ने गमवावी लागली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT