BCCI Announced Incentive Saam Tv
Sports

BCCI Announced Incentive: इंग्लंडला लोळवणाऱ्या टीम इंडियाला बीसीसीआयचं मोठं गिफ्ट; जय शहांची घोषणा

BCCI : धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडचा एक डाव आणि ६४ धावा राखत पराभव केला. पाच सामन्यांची मालिका टीम इंडियान ४-१ ने जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील संघाने पहिली कसोटी गमावल्यानंतर सलग ४ कसोटी सामने जिंकत नवा इतिहास रचलाय.

Bharat Jadhav

Bcci Secretary Jay Shah Announces Test Cricket Incentive :

पाच सामन्यांची मालिका टीम इंडियाने ४-१ ने जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील संघाने पहिली कसोटी गमावल्यानंतर सलग ४ कसोटी सामने जिंकत नवा इतिहास रचलाय. पहिला सामना पराभूत झाल्यानंतर पुनरागमन करत उर्वरित सर्व ४ सामने जिंकण्याचा विक्रम भारताने केलाय. हा विक्रम ११२ वर्षांनंतर घडलाय. टीम इंडियाच्या या कामगिरीची दखल घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघाला मोठं गिफ्ट दिलंय. पाचवा कसोटी सामना जिंकल्यानंतर बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसाठी तिजोरी खुली केलीय.(Latest News)

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंना इन्सेटिंव्ह पगार देण्याची घोषणा केली. जय शाह यांनी या घोषणेची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिलीय. भारतीय पुरुष संघाच्या खेळाडूंसाठी कसोटी क्रिकेट इन्सेटिंव्ह स्कीमची घोषणा करताना मला आनंद होत आहे. खेळाडूंचा आर्थिक विकास आणि त्यांना स्थिरता देण्यासाठी ही प्रोत्साहन पे देण्यात आहे. ही प्रोत्साहन पे देण्याची योजना म्हणजेच इन्सेटिंव्ह स्कीम देण्याची योजना २०२२-२३ पासून सुरू झालीय. कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना म्हणजे सध्या कसोटी सामन्यांसाठी खेळाडूंना १५लाख रुपयांचे मानधन दिले जाते, हे मानधन सोडून खेळाडूंना अतिरिक्त बक्षीस दिलं जाणार आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

समजून घ्या पगाराचे गणित

प्रत्येक मालिकेदरम्यान ९कसोटी सामने असू शकतात. यात जर एखाद्या खेळाडूने यापैकी चार कसोटी खेळल्या तर त्याला प्रत्येक सामन्यासाठी १५ लाख रुपये मिळतील, तर राखीव खेळाडूंना त्यातील निम्मी रक्कम मिळेल. पण जर त्याने किमान ५ ते ६ सामने खेळले तर सुरुवातीच्या ११ मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूची मॅच फी दुप्पट होऊन ३० लाख रुपये होईल. यामुळे राखीव खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी १५ लाख रुपये मिळतील.

मालिकेतील ७ किंवा त्याहून अधिक सामन्यांसाठी एखादा खेळाडू सुरुवातीच्या ११ मध्ये असेल तर त्याला प्रत्येक सामन्यासाठी ४५ लाख रुपये आणि राखीव खेळाडूंना २२.५ लाख रुपये मिळतील. जे क्रिकेटर १० खेळाडूंमध्ये कायम राहतील त्यांना १५ लाख रुपयांपेक्षा मानधन मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देणार साथ

Makeup Tips: जुने मेकअप प्रॉडक्ट्स वापरताय? होऊ शकतं इन्फेक्शन, अशी घ्या काळजी

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Maharashtra Live News Update: धुळ्यात मंकीपॉक्सचा सहावा रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT