बीसीसीआय आयपीएलच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्याच्या तयारीत.
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आयपीएल घेण्याचा विचार सुरू.
वर्षातून दोनदा आयपीएल आयोजित करण्याचाही पर्याय तपासला जातोय.
इंडियन प्रीमियर लीगचा 19वा हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाच, BCCI पुढील हंगामात मोठे बदल करण्याच्या विचारात आहे. विशेष म्हणजे, IPL चे सामने मार्च-मेऐवजी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्याचा बीसीसीआय करत आहे. यासोबतच वर्षातून दोनदा IPL आयोजित करण्याचाही पर्याय तपासला जातोय आहे, अशी माहिती IPL चे चेअरमन अरुण धूमल यांनी दिली आहे.
आयपीएल २०२६ या हंगामाची सुरुवात 28 मार्चला झाली आहे आणि ३१ मे रोजी अंतिम सामन्याने स्पर्धेचा शेवट होणार आहे. मात्र यंदा उत्तर आणि पश्चिम भारतात वाढलेल्या प्रचंड उष्णतेचा परिणाम सामन्यांवर आणि प्रेक्षकांच्या उपस्थितीवरही दिसून आला. यामुळे बीसीसीआय वेळापत्रक बदलण्याचा विचार करत आहे.
मे महिन्यातील तीव्र उकाड्यामुळे स्टेडियममध्ये प्रेक्षकांची संख्या कमी येतेय. यासह खेळाडूंच्या फिटनेसवर परिणाम होतोय. दुपार आणि संध्याकाळच्या सामन्यांदरम्यान हवामानाचा अडथळा निर्माण होतोय. या सगळ्या गोष्टींमुळे BCCI पर्यायी वेळापत्रकाचा विचार करत आहे.
एका मुलाखतीत अरुण धूमल यांनी सांगितलं की, ब्रॉडकास्टर्ससोबत चर्चा करून आयपीएल दुसऱ्या वेळेत हलवता येईल का, यावर विचार सुरूय. सप्टेंबर-ऑक्टोबर हा कालावधी आयपीएलसाठी योग्य ठरू शकतो. कारण तो दिवाळीच्या आसपास येतो आणि जाहिरातदारांसाठीही तो फायदेशीर काळ मानला जातो, असंही अरुण धूमल म्हणाले.
फक्त वेळापत्रक बदलण्याचाच नाही, तर IPL दोन टप्प्यांत घेण्याचाही विचार BCCI करत आहे. यात फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत पहिला टप्पा. तर दुसरा टप्पा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होईल. परंतु आयपीएलमध्ये इतर देशाच्या संघातील खेळाडू सहभाग घेतात, त्यामुळे इतर क्रिकेट बोर्डांशी चर्चा करावी लागणार आहे, कारण आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपलब्धता हा सर्वात मोठा मुद्दा असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.