bcci need to solve these questions while t20 world cup squad selecion amd2000
bcci need to solve these questions while t20 world cup squad selecion amd2000 twitter
क्रीडा | IPL

T20 World Cup 2024: 'जयस्वाल की गिल' अन् 'रिंकू की दुबे'? T20 WC साठी संघाची निवड करताना BCCI समोर असतील हे प्रश्न

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धा झाल्यानंतर टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेला १ जूनपासून प्रारंभ होणार असून स्पर्धेतील सामने वेस्टइंडीज आणि अमेरिकेत रंगणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंड संघाविरुद्ध रंगणार आहे. तर भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार ९ जून रोजी रंगणार आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंमध्ये चुरशीची लढत रंगणार आहे.

या स्पर्धेला १ जूनपासून सुरुवात होणार असली तरीदेखील १५ सदस्यीय संघाची निवड करुन संघाची यादी पाठवण्याची शेवटची तारीख १ मे रोजी असणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, ' भारतीय संघाची निवड करताना कुठलाही प्रयोग किंवा मैदानावरील कामगिरी पाहिली जाणार नाही. ज्या खेळाडूंनी सातत्याने भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे, त्यांना भारतीय संघात स्थान दिलं जाईल.'

हे खेळाडू शर्यतीत...

या संघात यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलपैकी एकाला संघात स्थान दिले जाऊ शकते. मात्र या दोघांचीही निवड केली गेली तर शिवम दुबे आणि रिंकू सिंगपैकी एकाला बाहेर बसावं लागेल. तर यष्टीरक्षक म्हणून संघात स्थान मिळवण्यासाठी केएल राहुल, इशान किशन आणि जितेश शर्मा यांच्यात चुरशीची लढत सुरु आहे. तर रिषभ पंतला संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

हार्दिक पंड्याच्या फिटनेसने वाढवलं टेन्शन..

हार्दिक पंड्याच्या फिटनेसने निवडकर्त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. तो जर पूर्णपणे फिट असेल तर त्याला या संघात स्थान दिले जाऊ शकते. यासह विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा,जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, रिषभ पंत,अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांना संघात स्थान मिळवं जवळजवळ कन्फर्म आहे.

गिल की जयस्वाल?

आयपीएल २०२४ स्पर्धेत गिलने धावांचा पाऊस पाडला आहे. तर यशस्वी जयस्वालची बॅट पूर्णपणे शांत आहे. मात्र यापूर्वी झालेल्या मालिकांमध्ये त्याने चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. तो डाव्या हाताचा फलंदाज असल्याने त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे. मात्र जर गिलनेही धावा करणं सुरु ठेवलं तर निवडकर्त्यांना कठोर निर्णय घ्यावे लागतील. या दोघांपैकी एकाला संघात स्थान मिळण्याची चर्चा सुरु आहे. मात्र जर दोघांनाही संघात घेतलं तर रिंकू सिंग आणि शिवम दुबेपैकी एकाला बाहेर बसावं लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Gous Shaikh Motivatinal Story | पायाने पेपर लिहला! हात नसलेल्या या चॅम्पीयनचा पॅटर्नच वेगळा आहे.

Special Report : चिकन फ्राय की गटर फ्राय? संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर आक्षेपार्ह टप्पणी करणं भाजप उमेदवाराला पडलं महागात, निवडणूक आयोगाने केली मोठी कारवाई

Tanisha Bormanikar HSC News | बुद्धीबळ खेळणाऱ्या तनिषाने थेट 100 पैकी 100 मार्क्स मिळवले!

Special Report | Pune Porche Accident : मुलगा बेदरकार, बाप जबाबदार! पुणे अपघात प्रकरणातील मोठी घडामोड

SCROLL FOR NEXT